शहरं
Join us  
Trending Stories
1
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
2
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
3
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
4
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
5
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
6
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
7
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
8
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
9
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
10
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
11
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
12
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
13
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
14
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
15
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
16
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
17
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
18
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
19
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन
20
एसटीप्रमाणे आरटीओच्या जागांचाही विकास; प्रताप सरनाईक यांचे आढावा घेण्याचे निर्देश

‘शिवकुमार’च्या उपचारासाठी धावली ‘रवळनाथ’

By admin | Updated: December 11, 2014 00:03 IST

शस्त्रक्रियेसाठी मदत : ‘रवळनाथ हौसिंग फायनान्स’कडून दहा हजारांचा धनादेश--लोकमत इनिसिटीव्ह

गडहिंग्लज : चंदगड येथे तिसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या येथील शिवकुमार अजित गवळी या विद्यार्थ्याच्या उपचारासाठी आजऱ्याच्या श्री. रवळनाथ को-आॅप. हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे दहा हजारांची मदत देण्यात आली.गतवर्षी जूनमध्ये मित्रांसोबत फिरायला गेला असताना हा अपघात झाला. अपघातामुळे ६७ टक्क्यांंनी दहावी उत्तीर्ण होऊनदेखील त्याला पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेता आलेला नाही. ११ वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याच्या शिक्षणासाठी आई मोलमजुरी करते. अपघातात त्याच्या मेंदू व पोटाला गंभीर दुखापत झाल्यामुळे लोकांनी वर्गणी काढून त्याच्यावर सुमारे चार लाख रुपये खर्चाच्या दोन शस्त्रक्रिया बेळगावच्या केएलई हॉस्पिटलमध्ये केल्या. शस्त्रक्रियेवेळी त्याच्या मेंदूच्या कवटीचा काही भाग बाजूला काढून ठेवण्यात आला आहे. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर तो हिंडू-फिरू लागला आहे. मात्र, काढून ठेवलेला कवटीचा भाग बसविण्यासाठी पुन्हा एका शस्त्रक्रियेची गरज असून, त्यासाठी आणखी एक लाखाची आवश्यकता आहे. यासंदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने ८ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यामुळे सामाजिक बांधीलकी जपण्यात नेहमी पुढे असणाऱ्या ‘रवळनाथ’ने शिवकुमारच्या उपचारासाठी त्याची आई पूजा यांना दहा हजारांची मदत दिली.‘रवळनाथ’च्या गडहिंग्लज शाखा कार्यालयात शाखाध्यक्ष प्रा. जे. बी. केसरकर यांच्या हस्ते पूजा यांनी धनादेश स्वीकारला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले, शाखा सल्लागार प्रा. एम. एस. मरजे, सुभाष हेब्बाळे, गजानन गिजवणेकर, एकनाथ केसरकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)