शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रविकांत तुपकरांचे राजू शेट्टी यांना दहा पानी पत्र, नेतृत्वावरील आक्षेपांची नोंद, निर्णय समितीच्या कोर्टात

By भीमगोंड देसाई | Updated: August 16, 2023 21:51 IST

Ravikant Tupkar:

- भीमगोंडा देसाई कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीच्या सूचनेनुसार मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना दहा पानी पत्र पाठवले आहे. हे पत्र माजी खासदार शेट्टी यांना मिळाले असून, त्यांनी ते समितीकडे दिले आहे. पत्रावर समितीला लेखी म्हणणे देणे आणि प्रसंगी हजर राहून तुपकरांनी घेतलेल्या आक्षेपांवर खुलासा करण्याची भूमिकाही शेट्टी यांनी घेतली आहे.

तुपकरांनी प्रसारमाध्यमांतून नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राज्य पातळीवरील संघटनेच्या शिस्तपालन समितीने तुपकरांना हजर राहून बाजू मांडण्याची संधी दिली होती. मात्र, ते उपस्थित राहिले नाहीत. त्यांना समितीने १५ ऑगस्टपर्यंत हजर राहून म्हणणे मांडण्याची मुदत दिली होती; पण त्यांनी हजर राहून म्हणणे मांडण्याऐवजी थेट शेट्टी यांनाच पत्र पाठवून भूमिका मांडली आहे. तुपकरांनी दिलेल्या पत्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या काळातील घडामोडी, संघटनेची विविध आंदोलने, दाखल झालेले शेकडो गुन्हे, पोलिसांचा लाठीमार, तडीपारी, तुरुंगवास यांचा उल्लेख केला आहे. तुपकरांचे पत्र समितीकडे पाठवले आहे. पत्रात संघटनेचे कार्य, आंदोलनातील दाखल झालेले गुन्हे, पदाधिकाऱ्यांतील वादांचा उल्लेख आहे. या पत्रावर माझाही खुलासा समितीकडे देणार आहे. समितीने बोलवले तर हजर राहणार आहे.-राजू शेट्टी, संस्थापक-अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरRaju Shettyराजू शेट्टी