शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईनमध्ये रत्नागिरीची बाजी

By admin | Updated: February 10, 2015 23:54 IST

महावितरण कंपनी: महिनाभरात पावणे दोन कोटींचा महसूल

रत्नागिरी : घरोघरी इंटरनेट सुविधा उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना घरबसल्या वीजबिल भरणे सोपे झाले आहे. जानेवारी महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यातील १३ हजार ३४४ ग्राहकांनी आॅनलाईन वीजबिल भरल्यामुळे महावितरणला १ कोटी ७८ लाख ९६ हजार ६० रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. सर्वाधिक महसूल रत्नागिरी विभागातून प्राप्त झाला आहे. शिवाय चिपळूण व खेड विभागापेक्षा अधिक महसूल रत्नागिरी शहरातून मिळाला आहे.ई-लर्निंगच्या युगात आता महावितरण कंपनीचा कारभारही संगणकीय होऊ लागला आहे. इंटरनेट सुविधेतून आता महावितरण कंपनीचा महसूल वाढत आहे. रत्नागिरी विभागातील एकूण ७ हजार ३१३ ग्राहकांनी आॅनलाईनव्दारे वीज बील भरल्यामुळे ९८ लाख ९२ हजार २३० रूपयांचा महसूल मिळाला आहे. विभागातंर्गत देवरूखातील ४६९ ग्राहकांनी ६२ हजार १६० रूपये, रत्नागिरी ग्रामीण १ मधून १०९४ ग्राहकांनी १० लाख ६८ हजार ४८० तर ग्रामीण २ मधून ५०३ ग्राहकांनी १२ लाख २७ हजार ४४०, रत्नागिरी शहरातील २५५७ ग्राहकांनी ४७ हजार ८३ हजार ८८० रूपयांचा महसूल महावितरणकडे जमा केला आहे. राजापूर १ मधील १२५७ ग्राहकांनी ८ लाख ३३ हजार ४९०, राजापूर २ मधील ६११ ग्राहकांनी ४ लाख २ हजार ८७० तसेच संगमेश्वरातील ४६५ ग्राहकांनी ५ लाख ३ हजार १४० रूपये वीजबिलाचे भरले आहेत.चिपळूण विभागातंर्गत शहरातील १३५४ ग्राहकांनी १५ लाख ७८ हजार ७१०, ग्रामीणमधील ३९९ ग्राहकांनी ८ लाख ८२ हजार ६९०, गुहागरमधील ११३६ ग्राहकांनी ११ लाख ५५ हजार ७४०, सावर्डेतील ५१७ ग्राहकांनी ४ लाख ५९ हजार ६०० रू मिळून एकूण ३४०६ ग्राहकांनी ४० लाख ७६ हजार ७४० रूपये वीजबिलाचे भरले आहेत.खेड विभागातंर्गत दापोली १ मधील ४९७ ग्राहकांनी ५ लाख २ हजार १४०, दापोली २ मधील ३३९ ग्राहकांनी ६ लाख ९४ हजार ४३०, खेडमधील ४१७ ग्राहकांनी ५ लाख ५१ हजार ८३०, मंडणगड येथील ८०५ ग्राहकांनी ६ लाख ४८ हजार ५७०, लोटे येथील ५६७ ग्राहकांनी १५ लाख ३० हजार १२० मिळून एकूण २६२५ ग्राहकांनी ३९ लाख २७ हजार ९० रूपयांचा महसूल जमा केला आहे.शहरी भागातून आॅनलाईन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल अधिक दिसून येत आहे. रत्नागिरी शहरातून आॅनलाईन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा अधिक ओढा दिसून येत आहे. त्यामुळेच, खेड व चिपळूण विभागापेक्षा अधिक महसूल रत्नागिरी शहरातून प्राप्त झाला आहे. शहराबरोबर ग्रामीण भागातूनही आॅनलाईनव्दारे वीजबिल भरण्यासाठी चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. कालांतराने याच्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)विभागनिहाय मिळालेला महसूलरत्नागिरी विभाग देवरूख४६९ ग्राहक६२ हजार १६० रूपयेरत्नागिरी ग्रामीण ११०९४ ग्राहक१० लाख ६८ हजार ४८०ग्रामीण २५०३ ग्राहक१२ लाख २७ हजार ४४०रत्नागिरी शहर२५५७ ग्राहक४७ हजार ८३ हजार ८८० रूपयेराजापूर ११२५७ ग्राहक८ लाख ३३ हजार ४९०राजापूर २६११ ग्राहक४ लाख २ हजार ८७०संगमेश्वर४६५ ग्राहक५ लाख ३ हजार १४० रूपयेएकूण ग्राहक७ हजार ३१३९८ लाख ९२ हजार २३० रूपये चिपळूण विभागशहर१३५४ ग्राहक१५ लाख ७८ हजार ७१०ग्रामीण३९९ ग्राहक८ लाख ८२ हजार ६९०गुहागर११३६ ग्राहक११ लाख ५५ हजार ७४०सावर्डे५१७ ग्राहक४ लाख ५९ हजार ६००एकूण ग्राहक३४०६४० लाख ७६ हजार ७४० रूपये खेड विभागदापोली १४९७ ग्राहक५ लाख २ हजार १४०दापोली २३३९ ग्राहक६ लाख ९४ हजार ४३०खेड४१७ ग्राहक५ लाख ५१ हजार ८३०मंडणगड८०५ ग्राहक६ लाख ४८ हजार ५७०लोटे५६७ ग्राहक१५ लाख ३० हजार १२०एकूण ग्राहक२६२५३९ लाख २७ हजार ९० रूपये रत्नागिरी विभागातील एकूण ७ हजार ३१३ ग्राहकांनी आॅनलाईनव्दारे भरले वीजबिल.चिपळूण विभागातंर्गत शहरातील १३५४ ग्राहकांनी १५ लाख ७८ हजार ७१०, ग्रामीणमधील ३९९ ग्राहकांनी ८ लाख ८२ हजार ६९० भरले आॅनलाईन वीजबिल.शहरी भागातून आॅनलाईन विजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल अधिक.रत्नागिरी शहरातून आॅनलाईन वीजबील भरण्याकडे ग्राहकांचा अधिक ओढा.खेड, चिपळूण विभागापेक्षा रत्नागिरी शहरातून अधिक महसूल.