रत्नागिरी : रत्नागिरीचे सहा कलावंत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. त्यात रत्नागिरीतील राधाकृष्ण कलामंचचे अनिल दांडेकर, राजकिरण दळी, दीप्ती कानविंदे, प्रेरणा दामले, आणि गुरू प्रसाद आचार्य (वाघांबे-गुहागर) यांचा समावेश आहे.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने २०१४ या सालासाठी पुरस्कार जाहीर केले आहेत. पुरस्कारांची फेररचना केली असून, एकूण रंगभूमीच्या सर्वांगाचा विचार करून ३८ पुरस्कारांची निवड केली आहे. यात सर्वोत्कृष्ट निवेदक - दीप्ती कानविंदे, प्रायोगिक संगीत नाटकातील सर्वोत्कृष्ट गायक अभिनेता - गुरू प्रसाद आचार्य, प्रायोगिक संगीत नाटकातील सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्री - प्रेरणा दामले, सर्वोत्कृष्ट लेखक (प्रायोगिक रंगभूमीवरील नाटक) - अनिल दांडेकर, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (प्रायोगिक नाटक) - राजकिरण दळी आणि सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संगीत नाटक पुरस्कार येथील राधाकृष्ण कलामंच (नाटक - संगीत स्वयंवर) या नाट्य संस्थेला जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण सोहळा १४ जून रोजी सायंकाळी ७ वाजता मुंबईतील यशवंत नाट्यमंदिर येथे संमेलनाध्यक्ष फय्याज यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी महसूलमंत्री एकनाथ खडसे हे उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पुरस्कारांवर रत्नागिरीची मोहर
By admin | Updated: June 4, 2015 00:02 IST