शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी शहर होणार ‘स्मार्ट सिटी’

By admin | Updated: April 1, 2015 00:00 IST

पनवेलचाही समावेश : पाच वर्षांत स्वयंपूर्ण होणार; राज्यातील १२ पालिकांचा समावेश

प्रकाश वराडकर - रत्नागिरी -‘स्मार्ट सिटी’ योजनेसाठी राज्यातील १२ नगरपालिकांची निवड झाली असून त्यात पनवेल व रत्नागिरी या कोकणातील दोन नगरपालिकांचा समावेश आहे. या योजनेच्या निकषात बसणाऱ्या राज्यातील १२ पालिकांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना मुंबई येथे पालिका प्रशासन संचालकांच्या दालनात योजनेबाबतचे मार्गदर्शन केले असून, येत्या पाच वर्षांत या १२ नगरपालिकांची शहरे सुविधांबाबत स्वयंपूर्ण बनविली जाणार आहेत. स्मार्ट सिटीसाठी काय निकष आहेत, ते पूर्ण करण्याबाबत व कोणत्या विकासाच्या योजना त्यातून साकार करता येतील याबाबतचे मार्गदर्शन संचालकांनी घेतलेल्या बैठकीत करण्यात आले. त्याचबरोबर नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांची त्यांच्या शहरांमधील संभाव्य विकासाबाबतची मतेही जाणून घेण्यात आली. रत्नागिरी शहराची लोकसंख्या ७७ हजार असून हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने दररोज बाहेरगावाहूून येथे नोकरी व शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांमुळे शहरात दररोज लाख ते सव्वा लाख लोकांचा भार पडतो. त्यासाठी सध्याच्या सर्वच मूलभूत सुविधांवर ताण पडत आहे. पाणी व्यवस्थेचे पूर्णत: नूतनीकरण करण्याची आवश्यकता आहे. रत्नागिरी शहरात मध्यमवर्गीयांची संख्या अधिक आहे. मच्छिमारी व आंबा, काजू बागायतीवर अर्थव्यवस्था असलेल्या या शहरातील व्यापारीपेठही मोठी आहे. कोकण रेल्वेमुळे हे शहर मुंबईशी काही तासांच्या अंतराने जोडले गेले आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायही मोठा आहे. शैक्षणिक सुविधांमध्येही रत्नागिरी आघाडीवर आहे.शहरातील भूूमिगत गटारे, वीजवाहिन्या भूमिगत उभारणे, पाण्याची परिपूर्ण सुविधा, वाहतूक, दळणवळणाबाबत सक्षमता आणणे, उद्योगांना चालना देऊन रोजगार निर्मिती करणे व सर्वच बाबतीत शहर स्वयंपूर्ण करण्याबाबतची योजना रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी मांडली आहे.निकषांची पूर्तता केल्यामुळेच निवडस्मार्ट सिटीसाठी घरफाळा व पाणीपट्टी करवसुली ही ९० टक्केवर असणे आवश्यक आहे. तसेच अन्य विकासकामे, सध्याच्या सुविधा याबाबतचे निकष पालिकेकडून पूर्ण होणे आवश्यक होते. या निकषात रत्नागिरी नगरपालिका बसत असल्याने निवड झाली आहे. स्मार्टसिटीअंतर्गत सुविधा भविष्यकालीन दृष्टिकोन समोर ठेवून आखणे, शहर सर्व सुविधांबाबत स्वयंपूर्ण करणे अशी ही योजना असून, त्यासाठी राज्य व केंद्र निधी देणार आहे.