शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

रेठरे बुद्रुकच्या दाम्पत्याला अटक

By admin | Updated: December 22, 2015 01:07 IST

खडकी पोलिसांची कारवाई : तपास अधिकाऱ्याला धमकी

पुणे/सातारा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पथकामधील पोलीस अधिकाऱ्याला तपास न थांबविल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुकच्या दाम्पत्याला खडकी पोलिसांनी रविवारी अटक केली. अधिकाऱ्याकडे २५ लाख रुपयांची खंडणीही मागण्यात आली होती. सोमवारी त्यांना खडकी न्यायालयात हजर केले असता २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांना धमकी देण्यात आली होती. चंद्रकांत दिनकर मोहिते (वय ४१) आणि त्याची पत्नी संगीता मोहिते (२५, दोघेही रा. रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात खडकी पोलीस ठाण्यात खंडणी व जिवे मारण्याची धमकी देण्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. दाभोलकर यांची २० आॅगस्ट २०१३ रोजी गोळ््या घालून हत्या करण्यात आली होती. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी सीबीआयला मदत करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सात अधिकाऱ्यांमध्ये घोडके यांचा समावेश आहे. खडकी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलाकर ताकवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास करीत असताना त्यांना दोन डिसेंबर रोजी मोबाईलवर धमकीचा मेसेज आला. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास थांबवावा, असे त्यात म्हटले होते. त्यानंतर नऊ डिसेंबरला त्यांना पुन्हा एकदा मेसेज आला. त्यामध्येही तपास थांबवा, असे म्हटले होते. तसेच तपास न थांबविल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. घोडके यांच्याकडे २५ लाख रुपयांची मागणीही करण्यात आली होती. घोडके यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार १७ डिसेंबरला खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मोहिते दाम्पत्यांची रेठरे बुद्रुक येथे दोन-अडीच एकर शेती आहे. त्यांना दोन लहान मुले आहेत. शेतीतच मजुरी करून ते उदरनिर्वाह करतात. (प्रतिनिधी)मोबाईल क्रमांकावरून शोधपोलिसांनी मोबाईलच्या क्रमांकाचा ट्रेस लावला असता हा क्रमांक कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील चंद्रकांत मोहिते व संगीता मोहिते यांच्या नावावर असल्याचे समोर आले. त्याआधारे त्यांचा पत्ता शोधून खडकी पोलिसांचे पथक कऱ्हाडला रवाना झाले. त्या दोघांनाही रविवारी अटक केली. सोमवारी दोघांनाही खडकी न्यायालयात हजर करण्यात आले.