शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याची आवक वाढल्याने दर गडगडले

By admin | Updated: August 3, 2016 01:02 IST

संपाचा परिणाम : शहरातील किरकोळ बाजारपेठ सुरळीत;नागरिकांची खरेदीसाठी गर्दी

कोल्हापूर : अडत वसुलीबद्दल भाजीपाला खरेदीदारांनी एक दिवस संप केल्याने मंगळवारी आवक एकदम वाढली. परिणामी दर गडगडले. कोबी, ढबू, गवार, भेंडी, वरणा, फ्लॉवर या प्रमुख भाज्यांच्या दरांत कमालीची घसरण झाली. शहरातील किरकोळ भाजी बाजारपेठा पूर्ववत सुरू झाल्या. भाजीपाला, कांदा-बटाटा व फळे या नाशवंत मालावरील सहा टक्क्यांप्रमाणे अडत शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडून वसूल करावी, असे आदेश ५ जुलै रोजी राज्य सरकारने बाजार समित्यांना दिले आहेत; पण जाहीर लिलावात चढ्या भावाने शेतीमाल खरेदी केल्याने पुन्हा अडत कशासाठी द्यायची, असा प्रश्न खरेदीदार समिती प्रशासनाला विचारीत आहेत. तरीही अडत वसुली सुरू असल्याने खरेदीदारांनी सोमवारी (दि. १) बाजारपेठ बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यामध्ये कोल्हापूर शहरातील विविध किरकोळ बाजारपेठांमधील व करवीर तालुक्यातील खरेदीदार सहभागी झाले होते. खरेदीदारांनी संप केल्याने भाजीपाला मार्केट थंडावले होते. बाजार समितीची सुमारे ५० लाखांची उलाढाल ठप्प झाली होती. त्याचबरोबर शहरातील बाजारपेठा बंद राहिल्याने तेथील लाखो रुपयांची उलाढाल होऊ शकली नाही. एक दिवसाच्या संपामुळे मंगळवारी बाजार समितीमध्ये भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. यामध्ये कोबी, वांगी, दोडका, फ्लॉवर, ओली मिरची, ढबू, गवार, कारली, भेंडी, वरणा, दोडका या फळभाज्यांची आवक दुप्पट झाली. त्यामुळे दरांत कमालीची घसरण झाली. घाऊक बाजारात कोबी १५, वांगी २५, टोमॅटो ८, गवार २०, ओला वाटाणा ४५, कारली ३५ रुपये प्रतिकिलो असा दर राहिला आहे. पालेभाज्यांची आवक मंदावल्याने तुलनात्मक दरांत मात्र वाढ झाली आहे. गेले दोन दिवस सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असल्याने भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.