हेरे (ता.चंदगड) येथे परिसरातील नागरिकांनी शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन केले. चंदगड-तिलारी रस्ता हा पारगड व तिलारी पर्यटनस्थळांना जोडणारा रस्ता असून त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. त्याचा त्रास पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनादेखील होत असल्याने तो तत्काळ पूर्णत्वास न्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हेरेचे सरपंच पंकज तेलंग यांच्या नेतृत्वाखाली बसस्टॉपवर परिसरातील सरपंच, उपसरपंचासंह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी सभापती ॲड. अनंत कांबळे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांनी येथे भेट देऊन या मार्गासाठी प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले. लेखी आश्वासन दिल्यानंतर हे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी सुधाकर गावडे (पार्ले), अंकुश गवस (कळसगादे), महादेव गावडे (मोटणवाडी), राजू पाटील (सावर्डे), जांबरेकर (उपसरपंच, सावर्डे), तुकाराम धुरी (सरपंच, गुडवळे), बंडू पाटील (सावर्डे), विशाल बल्लाळ, शंकर चव्हाण (माजी सरपंच, हेरे), आप्पाजी गावडे (उपसरपंच, हेरे), चंद्रकांत पाटकर, योगेश बल्लाळ , विवेक पाटील, सचिन वाघराळी, मोहन पाटील, विजय पाटकरसह पंचक्रोशीतील नागरिक व व्यापारी उपस्थित होते.
फोटो ओळी :-- २९ हेरे रास्ता रोको
1) हेरे ता चंदगड येथे चंदगड- तिलारी रस्ता डांबरीकरण व रुंदीकरण करावे या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करताना नागरिक 2)आंदोलक नागरिकांशी चर्चा करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी