शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

दुर्मीळ म्हांडूळ सापाची तस्करी

By admin | Updated: August 26, 2015 00:25 IST

पाचजणांच्या टोळीस पकडले : दोन लाखाचे दोन सर्प हस्तगत

मिरज : गुप्तधन व पैशाचा पाऊस पाडण्याच्या विधीसाठी दुर्मीळ म्हांडूळ जातीच्या सापाची तस्करी व विक्री करणाऱ्या पाचजणांच्या टोळीस पोलिसांनी बेळंकी येथे ताब्यात घेतले. त्यांच्याकडून म्हांडूळ जातीचे दोन सर्प, तीन मोटारसायकली असा दोन लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला. सर्प तस्करांच्या या टोळीस वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांना सापांची तस्करी करणारी पाचजणांची टोळी सर्पविक्री करण्यासाठी बेळंकी येथे आल्याची माहिती मिळाली. हवालदार संजय चव्हाण, प्रशांत कोळी, सागर आंबेवाडीकर, बसवराज शिरगुप्पी यांच्या पथकाने या तस्करांच्या टोळीशी संपर्क साधून, गुप्तधन काढण्यासाठी होमहवन करण्यासाठी म्हांडूळ सर्प खरेदी करण्याची तयारी दर्शविली. सापांचा सौदा ठरल्यावर बेळंकी येथील गव्हाणे पेट्रोल पंपाजवळ पाचजणांच्या टोळीस दोन सापांसह रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे तब्बल पाच किलो वजनाचे दोन साप हस्तगत करण्यात आले. सापांची तस्करी करणाऱ्या शहाजी मधुकर जाधव (वय २२, रा. बेळंकी रोड, खटाव), रमेश बाळासाहेब कोळेकर (२२, रा. इरळी, ता. कवठेमहांकाळ), अमोल तम्माण्णा चौगुले (२२), विकास तम्माण्णा चौगुले (१९), अनिल संभाजी खताळ (२३, रा. सलगरे, ता. मिरज) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा वन विभागाकडे वर्ग करून आरोपींना वन विभागाच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. म्हांडूळ साप तस्करीचे प्रकार वाढत चालले असून त्यावर प्रतिबंध आणण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. (वार्ताहर)एक आरोपी खासगी बँकेत व्यवस्थापकपकडण्यात आलेल्या आरोपींपैकी अनिल खताळ हा एका खासगी बॅँकेत व्यवस्थापक आहे. अमोल चौगुले हा एमबीएचे शिक्षण घेत आहे. त्याचा भाऊ विकास चौगुले हा बारावीत शिकत आहे, तर रमेश कोळेकर हा मुंबईत रिक्षाचालक म्हणून काम करतो. यावरून उच्चशिक्षित तरुण पैसे कमाविण्यासाठी सापांच्या तस्करीत गुंतल्याचे निष्पन्न झाले आहे. पकडलेल्या टोळीने दुर्मीळ म्हांडूळ साप कोठून आणले, आतापर्यंत त्यांची कोणाला विक्री केली आहे, याबाबत चौकशी करण्यात येत आहे.८० लाखांचा सौदापोलिसांनी बोगस गिऱ्हाईक पाठवून दोन म्हांडूळ सापांचा ८० लाखात सौदा ठरविला होता. पोलीस दोन दिवस या तस्करांच्या संपर्कात होते. गिऱ्हाईक बनून साध्या वेशात खासगी वाहनातून गेलेल्या पोलिसांनी टोळीस रंगेहात पकडले.