शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

कोविड केंद्रात निराधार अल्पवयीन मुलींवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:18 IST

कोल्हापूर : येथील महापालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या डीओटी कोविड केंद्रामध्ये एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन निराधार मुलीवर तिथे सेवेस असलेल्या वॉर्डबॉयनेच ...

कोल्हापूर : येथील महापालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या डीओटी कोविड केंद्रामध्ये एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन निराधार मुलीवर तिथे सेवेस असलेल्या वॉर्डबॉयनेच बलात्कार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांत बाललैंगिक प्रतिबंध कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. बलात्काराची घटना मेच्या अखेरीस घडली आहे. संबंधित मुलगी संस्थेत आल्यानंतर तिने याबद्दलची माहिती दिल्यावर बालकल्याण समितीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

एका अनाथ-निराधार मुलींचे संगोपन करणाऱ्या या संस्थेतील १३ मुली १७ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आल्या. पुढच्या टप्प्यात तीन दिवसांनी आणखी तीन मुली पॉझिटिव्ह आल्या. त्या सर्वांना महापालिकेच्यावतीने शिवाजी विद्यापीठातील डीओटी विभागामध्ये चालवण्यात येणाऱ्या कोविड केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या देखभालीसाठी संस्थेने दोन काळजीवाहक महिलाही नियुक्त केल्या होत्या. परंतु कोरोना रुग्णांची जिथे व्यवस्था केली होती तिथे त्यांना सोडण्यात येत नव्हते. या वॉर्डबॉयने त्या मुलीस लग्नाचे आमिष दाखविले. संस्थेतील निराधार मुली नेहमीच प्रेमाच्या ओलाव्यास आसुसलेल्या असतात. त्यामुळे त्याचा गैरफायदा घेत त्याने या केंद्रातील खोलीमध्येच तिच्यावर बलात्कार केला. अन्य मुलींकडून याची कुणकुण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना लागली. त्यांनी तातडीने याची माहिती बुधवारी सकाळीच बालकल्याण समितीला दिली. समितीच्या बैठकीत घडलेल्या घटनेची चौकशी करून राजारामपुरी पोलिसांना संबंधित वॉर्डबॉय‌वर बाललैंगिक प्रतिबंध कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याचा निर्णय झाला.

महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे संबंधितप्रकरणी गुन्हा नोंदवण्यासाठी आग्रह धरला. त्यानुसार पीडित मुलीचा जबाब घेऊन गुन्हा नोंदवण्याचे आदेश पोलिसांना दिले. या कायद्यान्वये संबंधित मुलीस जबाबासाठी पोलीस ठाण्यात बोलावता येत नाही. त्यामुळे संस्थेत जाऊन मुलीचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

डीओटी कोविड केंद्रामध्येडी आणखी काही मुली अशाच प्रकरणी बळी पडल्या असल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने समितीमार्फत चौकशी सुरू आहे, त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गतवर्षी याच डीओटी कोविड केंद्रामध्ये उपचार घेणा-या एका कोरोना पॉझिटिव्ह युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी तेथील एका वॉर्डबॉयला बेदम मारहाण करण्याची घटना घडली होती. त्या वॉर्डबॉयवर त्याचवेळी राजारामपुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर पुन्हा हा प्रकार उघडकीस आला आहे.