शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

रणजित पवार, अनिल चव्हाण यांची विजयी सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 13:03 IST

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित केलेल्या कामगार केसरी खुल्या गटात रणजित पवारने सौरभ मुसळे याला, तर कुुमार केसरी गटात अमरसिंह पाटील याने मारुती माने याला गुणांवर मात करीत स्पर्धेत विजयी सलामी दिली.

ठळक मुद्देरणजित पवार, अनिल चव्हाण यांची विजयी सलामीराज्यस्तरीय कामगार केसरी, कुमार केसरी कुस्ती स्पर्धा

कोल्हापूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित केलेल्या कामगार केसरी खुल्या गटात रणजित पवारने सौरभ मुसळे याला, तर कुुमार केसरी गटात अमरसिंह पाटील याने मारुती माने याला गुणांवर मात करीत स्पर्धेत विजयी सलामी दिली.हलगीच्या कडकडाटात राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात मंगळवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत कामगार केसरी खुल्या गटातील सलामीची लढत सोनहिरा साखर कारखाना (सांगली) चा मल्ल रणजित पवार व विठ्ठल कार्पोरेशन (माढा, जि.सोलापूर) चा मल्ल सौरभ मुसळे यांच्यात झाली.

रणजितने सुरुवातीला सौरभवर भारंद्वाज डाव टाकून चितपट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातून सौरभ सुटला. अखेरीस गुणांवर रणजितने बाजी मारत सलामीच्या विजयाची नोंद केली. दुसरी लढत क्रांती अग्रणी कुंडलचा मल्ल अनिल चव्हाण याने रणधीर खांडेकर याच्यावर मात केली. तर बिद्री साखर कारखान्याच्या अमरसिंह पाटील याने मारुती माने याचा गुणांवर पराभव करीत स्पर्धेत आगेकूच केली.स्पर्धेत रणजित पवार व सौरभ मुसळे यांच्यातील सलामीची लढत खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते लावण्यात आली. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, गोकुळचे चेअरमन रविंद्र आपटे, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यानिमित्त कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. मुंबई कल्याण आयुक्त महेंद्र तायडे यांनी स्वागत, तर आभार सहायक कल्याण आयुक्त घनश्याम कुळमेथे यांनी मानले.मंगळवारी रात्री उशिरापर्यंत विविध वजनीगटातील १५४ कुस्ती लढती झाल्या. बुधवारी दिवसभर स्पर्धेतील मुख्य लढती होणार आहेत. स्पर्धेसाठी पंच म्हणून संभाजी वरूटे, संभाजी पाटील, मारुती जाधव, बबन चौगले, बाबा शिरगावकर, राजाराम चौगले, प्रकाश खोत, बाळू मेटकर, तानाजी पाटील हे काम पहात आहेत.

 

 

टॅग्स :Wrestlingकुस्तीkolhapurकोल्हापूर