शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
2
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
3
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
4
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
5
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
6
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
7
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
8
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
9
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
10
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
11
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
12
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
13
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
14
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
15
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
16
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
17
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
18
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
19
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

आज रंगोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:24 IST

कोल्हापूर : रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी शहरातील प्रमुख चौकांत रंग, पिचकारी खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कोरोनाची दुसरी लाट ...

कोल्हापूर : रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी शहरातील प्रमुख चौकांत रंग, पिचकारी खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता सरकारकडून वर्तविली जात आहे. तरीसुद्धा रंगोत्सवाची जय्यत तयारी करण्यात युवावर्ग गुंतला होता.

मागील वर्षी कोरोनाचा कहर वाढल्यामुळे रंगपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी झाली नाही. त्यामुळे अनेकांनी यंदाची रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा मानस बाळगला होता. मात्र, पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे अनेकांनी सावध पवित्रा घेतला आहे. तरीसुद्धा बच्चेकंपनीच्या आग्रहाखातर पालकवर्गाने पिचकारी, कोरडे रंग, खाद्यरंग, नैसर्गिक रंग आदींची खरेदी जोरदार केली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी कोरोनामुळे साजरी न करता आलेली रंगपंचमी यंदा जोरात करण्याचा पवित्रा बच्चेकंपनीबरोबरच मोठ्यांनीही घेतला आहे. त्यामुळे शहरातील रंगांची दुकाने गुरुवारी दिवसभर गर्दीने ओसंडून वाहत होती. विशेष म्हणजे कोरड्या पिवडी रंगाच्या पोत्यांना अधिक मागणी होती. त्यामुळे शहरातील महानगरपालिका चौक, पापाची तिकटी, शिवाजी चौक, महाद्वार रोड, भवानी मंडप, ताराबाई रोड, पान लाइन, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी आदी ठिकाणी रंग खरेदी करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत बाजारात तरुणाईची गर्दी उसळली होती. दरम्यान, गुरुवारी शाळकरी विद्यार्थ्यांनी आज, शुक्रवारी शाळेला गुडफ्रायडेनिमित्त सुटी असल्यामुळे शाळेच्या परिसरात रंगपंचमी साजरी केली.

रंगीबेरंगी पिचकाऱ्यांसह रंग बाजारात

पाठीवरचा पंप, छोटा भीम, मोटू-पतलू, डोरेमॉन, सिनचॅन आदी पिचकाऱ्या बाजारात दाखल झाल्या आहेत. बाजारात पिचकाऱ्यांची किंमत २० पासून ५०० रुपयांपर्यंत होती. पॅकिंगप्रमाणे नैसर्गिक, रासायनिक, पर्यावरणपूरक, खाद्यरंगांची विक्री सुरू होती.

------------------------

पंचेचाळीस प्रकारच्या पाचशे किलो खाद्यरंगांची निर्मिती

चेहऱ्यासह पर्यावरणास कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचविणाऱ्या, हवा व पाण्याचे प्रदूषण न करणाऱ्या अशा तब्बल ५०० किलो खाद्यरंगांची निर्मिती निसर्गमित्र संस्थेने केली आहे. नैसर्गिक रंगांसह कडीपत्ता, पालक, पुदिना, बीट, गाजर, टॉमेटो, शेंद्री यापासून ४५ प्रकारचे खाद्यरंग बनवलेले आहेत. स्वत:ही हे रंग बनवून नागरिकांनी वापरावेत, असे आवाहन निसर्गमित्र अनिल चौगुले यांनी केले आहे.

फोटो : ०१०४२०२१-कोल-रंगपंचमी ०१, ०२

ओळी : कोल्हापुरातील खासबाग परिसरातील शाळेच्या परिसरात मुलींनी आज, शुक्रवारी शाळेला सुटी असल्यामुळे गुरुवारीच रंगपंचमी साजरी केली.

फोटो : ०१०४२०२१-कोल-रंगपंचमी ०३,०४,०५,०६

ओळी : कोल्हापुरातील खासबाग परिसरातील एका शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी आज, शुक्रवारी शाळेला गुडफ्रायडेनिमित्त सुटी असल्यामुळे गुरुवारीच रंगपंचमी साजरी केली. (छाया : आदित्य वेल्हाळ)