शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण पण क्रॉस व्होटिंग कुणाचा खेळ बिघडवणार?
2
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
3
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
4
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
5
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
6
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
7
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
8
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
9
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
10
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
11
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
12
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
13
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
14
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
15
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
16
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
17
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
18
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
19
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
20
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला

रंकाळा टॉवर रस्त्याचे पांग फिटले

By admin | Updated: November 20, 2014 00:00 IST

पालिकेला आली जाग : पाटणकर हायस्कूल ते रंकाळा टॉवर रस्त्याच्या कामाला सुरुवात

कोल्हापूर : रंकाळा बसस्थानक ते रंकाळा टॉवरच्या नवीन रस्त्याला अखेर महापालिकेला मुहूर्त मिळाला. आज, बुधवारपासून पहिल्या टप्प्यात रंकाळा टॉवरपासून ते नागोजीराव पाटणकर हायस्कूलपर्यंतच्या नवीन रस्त्याचा कामास प्रारंभ झाला. गेल्या तीन आठवड्यांपासून शहरातील खराब रस्ते व त्यांच्या झालेल्या दुरवस्थेसंदर्भात ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला होता. त्यामध्ये बहुतांश नागरिकांनी कंबरडे मोडणारे रस्ते अशी प्रतिक्रिया देत स्थानिक लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तब्बल हजारांहून अधिक मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताला आमंत्रण देणारा, शरीराची हाडं खिळखिळी करणारा, धुळीचे साम्राज्य निर्माण करून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणारा अशीच रंकाळा टॉवर रस्त्याची ओळख झाली होती. महापालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली. ‘लोकमत’ने ‘खड्ड्यात गेलंय कोल्हापूर माझं’ या वृत्तमालिकेद्वारे २९ आॅक्टोबरला ‘रस्ता दाखवा; बक्षीस मिळवा’या शीर्षकाखाली या रस्त्याची किती दुरावस्था झाली आहे ते सचित्र मांडले होते. दरम्यान, या बातमीचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेत नवीन रस्त्याच्या कामास आजपासून सुरुवात केली. गेल्या १५ वर्षांपासून हा रस्ता खराब होता. स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती महापालिका प्रशासनाकडून घेतली असता हा रस्ता चार प्रभागात असल्याने तो महापालिका निधी व नगरसेवकांना मिळणाऱ्या विकास निधीमधून केला नसल्याचे समजले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी रस्ता दुरुस्तीसाठी २०१० पासून लढा सुरू केला होता. त्यानंतर आयुक्तांची भेट घेतली. रस्त्यासंदर्भात गाऱ्हाणे मांडले. यावेळी आयुक्तांनी ड्रेनेजसाठी सहा लाखांचा निधी दिला. ड्रेनेजचे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्याला कोणी वालीच राहिला नाही. हा रस्ता ड्रेनेजचे काम पूर्ण झाल्यानंतर आहे तसाच पडून राहिला. रंकाळा तालीम मंडळसह परिसरातील तालीम मंडळे, तरुण मंडळांनी निदर्शने, रास्ता रोको आदी मार्गांनी आंदोलने केली. महापालिकेसह पोलीस प्रशासनाला निवेदने दिली. यासाठी परिसरातील भैया कदम, युवराज सूर्यवंशी, संजय भोसले, अजित कदम, प्रकाश दरवान, गणेश अडकते, चेतन दरवान, भिकशेठ रोकडे, हरी भोसले, गणेश चव्हाण, अनिल माने, दीपक संकपाळ आदींनी परिश्रम घेतले. ‘लोकमत’ने या सदराखाली गत महिन्यापासून रस्त्यांच्या खड्डे व दुरवस्थेसंदर्भात सुरू केली. रंकाळा टॉवर ते नागोजीराव पाटणकर हायस्कूल या नवीन रस्त्याच्या कामास सुरुवात झाली. यावेळी ‘लोकमत’ने ‘खड्ड्यात गेलंय कोल्हापूर माझं’ या वृत्तमालिकेद्वारे २९ आॅक्टोबरला ‘रस्ता दाखवा; बक्षीस मिळवा’या शीर्षकाखाली या रस्त्याची किती दुरवस्था झाली आहे ते सचित्र मांडले होते. त्यामुळेच रस्त्याची दुरुस्ती सुरू झाली याबद्दल नागरिकांतून ‘लोकमत’चे कौतुक होत होते. ४५ लाखांची तरतूद...रंकाळा बसस्थानक (श्री लस्सी सेंटर)पासून ते रंकाळा टॉवरपर्यंतच्या रस्त्यासाठी महापालिकेने ४५ लाखांची तरतूद केली आहे. हा रस्ता चार प्रभागात विभागला आहे. त्यामुळे या रस्त्यासाठी स्थानिक नगरसेवकांनी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात रंकाळा बसस्थानक ते पाटणकर हायस्कूलचा रस्ता होणार आहे.पंधरा वर्षांनंतर रस्त्याला डांबर लागत आहे. त्यामुळे विशेष आनंद होत आहे. प्रचंड धुळीच्या साम्राज्याला तोंड देताना नागरिकांनी प्रचंड शोषिकता दाखवली. ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेचे व आंदोलनाचे यश आहे.- भैया कदम, नागरिक.