शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर नगरपालिकेत रंगलंय राजीनामा नाट्य

By admin | Updated: May 10, 2017 22:27 IST

शहरात चर्चा : नगराध्यक्षांपाठोपाठ आता उपनगराध्यक्षांची खेळी, सोशल मीडियावरील झळकले पत्र

अशोक पाटील ।  --लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट करून काही तास जातात, तोपर्यंत उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादीला दिलेला पाठिंबा काढल्याबाबतच्या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. परंतु या पत्रावर पाटील यांची स्वाक्षरी नाही. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. पालिकेतील राजीनामानाट्याची चर्चा शहरभर सुरू आहे.विकास आघाडीचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील तीन दिवस पालिकेच्या कामकाजात सक्रिय नसल्याने त्यांच्या भूमिकेविषयी पालिका वर्तुळातून शंका व्यक्त होत होती. त्यांच्या काही विरोधकांनी तर पाटील यांनी राजीनामा दिल्याची अफवा पसरवली. त्यानंतर मंगळवारी खुद्द नगराध्यक्ष पाटील यांनी आपल्या दालनात कामकाजाला सुरुवात केल्याने या अफवांना पूर्णविराम मिळाला.या घडामोंडींना काही तासांचा अवधी जातो ना जातो तोच उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांची स्वाक्षरी नसलेले राष्ट्रवादीला दिलेला पाठिंबा काढून घेतल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे पत्र राष्ट्रवादीला देण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, ‘आपणास कळविण्यात येते की, मी आमदार जयंत पाटील यांच्या आग्रहाखातर राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. आपल्या पक्षातर्फे मला उपनगराध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान दिला. मी आपल्याला कोणत्याही प्रकारे दोष देत नाही. तथापि बऱ्याच गोष्टींनी माझे मन वारंवार दुखावले जात आहे. त्याचा मला मानसिक व शारीरिक त्रास होत आहे. आपण दिलेल्या ऋणाला मी योग्यप्रकारे न्याय देऊ शकत नसल्याचे वारंवार प्रत्ययास येत आहे. त्यामुळे मला या ऋणातून मुक्त करावे, ही विनंती. येथून पुढे मी सभागृहामध्ये आपल्या पक्षाच्या बाजूने असेन.’ राजीनामानाट्याची हवा तापली झाली आहे. आता दादासाहेब पाटील यांची भूमिका काय राहणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.पत्रामागचे नेमके इंगीत काय..?सोशल मीडियावरील पत्रामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत दादासाहेब पाटील यांच्याशी अनेकवेळा संपर्क साधण्याचा तसेच त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यांच्याकडून या पत्राबाबत खुलासा न झाल्याने यामागचे इंगीत काय, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद संजय कोरे यांनी याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले.