शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रेंगाळलेल्या शिवाजी पूलप्रश्नी ‘पुन्हा’ चर्चेचे गुऱ्हाळच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 18:57 IST

शिवाजी पुलाच्या रेंगाळलेल्या बांधकामासंदर्भात मंगळवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने (राष्ट्रीय महामार्ग विभाग) नागरी कृती समिती, पुरातत्त्व विभाग, पर्यावरण समिती, महापालिका यांची संयुक्त बैठक झाली. पण बैठकीत कोणताही ठोस निर्णय न होताच सुमारे तीन तासचर्चेचे गुऱ्हाळच चालू राहीले. पूलाचे काम रेंगाळण्यास प्रत्येक विभागाने आरोप-प्रत्यारोप करत एकमेकांना जबाबदार धरले.

ठळक मुद्देएकमेकावर आरोप-प्रत्यारोप तीन तासाच्या बैठकीनंतरही ठोस निर्णय नाहीआठवड्यात पालकमंत्र्यासह तीन खासदारांची बैठक बोलविण्याची मागणी

कोल्हापूर , दि. २४ : शिवाजी पुलाच्या रेंगाळलेल्या बांधकामासंदर्भात मंगळवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने (राष्ट्रीय महामार्ग विभाग) नागरी कृती समिती, पुरातत्त्व विभाग, पर्यावरण समिती, महापालिका यांची संयुक्त बैठक झाली. पण बैठकीत कोणताही ठोस निर्णय न होताच सुमारे तीन तासचर्चेचे गुऱ्हाळच चालू राहीले. पूलाचे काम रेंगाळण्यास प्रत्येक विभागाने आरोप-प्रत्यारोप करत एकमेकांना जबाबदार धरले.

दरम्यान, कायद्याचे उल्लंघन करुन बाधीत क्षेत्रात पूलासह कोणतेही बांधकाम करता येणार नसल्याचे केंद्रीय पुरातत्व विभाग कोल्हापूरचे संरक्षण सहायक विजय चव्हाण यांनी स्पष्ट केले.

आगामी संसदेच्या अधिवेशनात पुरातत्व कायद्यातील बदलाला मंजूरी मिळणे आवश्यक असल्याने त्यासाठी जनरेटा वाढवावा असेही आवाहन चव्हाण यांनी केले. त्यामुळे नागरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी येत्या आठवड्यात जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह तीन खासदारांची बैठक बोलवून हा प्रश्न तडीस लावण्याचा निर्णय घेतला.

शिवाजी पूलाचे अर्धवट स्थितीत रेंंगाळलेले बांधकाम त्वरीत पूर्ण करावे यासाठी कोल्हापूर जिल्हा नागरी कृती समितीच्यावतीने काही महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग विभाग) यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. यासाठी अधिकाºयांना घेरावा घालणे, जबाब दो आदी आंदोलने केली.

या पूलाच्या बांधकामाची प्रत्येक्ष काय स्थिती आहे, त्यासाठी विरोध कोणी केला, प्रशासनातर्फे काय पाठपुरावा केला, पुरातत्व विभागाची भूमीका काय, पूलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात मंगळवारी विवीध विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेण्यात आली.

यामध्ये कृती समितीच्या कार्यकर्त्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे (राष्ट्रीय  महामार्ग विभाग) कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे, उपअभियंता संपत आबदार, केंद्रीय पुरातत्व कोल्हापूर विभाग संरक्षण सहायक विजय चव्हाण, वृक्षप्राधिकरण समितीचे सदस्य उदय गायकवाड, महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत आदी अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी माजी महापौर आर. के. पोवार यांनी या बैठकीत शिवाजी पूलाबाबत लोकभावना समजून सांगितली, तसेच अधिकाºयांनी उत्तरे दिल्याशिवाय येथून जाणार नसल्याची भूमीका घेतली. या बैठकीत कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी अधिकाºयांवर प्रश्नांचा भडीमार केला. या प्रश्नांना अधिकाºयांनी दिलेल्या उत्तरातून कोणत्याही परवानगीबाबत कागदपत्रांची पूर्तता न करता घाईगडबडीत पूलाचे बांधकाम सुरु करण्यात आल्याचे दिसून आले.

दरम्यान, शिवाजी पूलाच्या बांधकामासाठी परवानगीबाबत पुरातत्व विभागाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने २ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला प्रस्ताव पाठविल्याची माहिती पुरातत्व विभागाचे विजय चव्हाण यांनी यावेळी दिली. त्यानंतर पूलाच्या बांधकामात आडवी येणारी झाडे, हौद, जकात नाका इमारत पाडण्यासाठी परवानगीबाबतच्या कागदपत्रांचा रंगलेला खेळ उपअभियंता संपत आबदार यांनी सर्वासमोर उघड केला.कायद्याचे उल्लंघन करुन बांधकाम करु नकाऐतिहासिक ब्रम्हपुरी टेकडीच्या १०० मीटर परिघातील बाधीत क्षेत्रात कोणतेही बांधकाम करता येणार नसल्याचे स्पष्टपणे सांगताना विजय चव्हाण यांनी, कायद्याचे उल्लंघन करुन शिवाजी पूलासह कोणतेही बांधकाम करता येणार नसल्याचे सांगितले.|आता नवा पूलही हेरीटेजशिवाजी पूलाचे आर्युमान संपल्याने शेजारी ८० टक्के झालेल्या पर्यायी पूलाच्या बांधकामाला जनहित पाहून पुरातत्व विभागाने परवानगी द्यावी, अन्यथा या लाल फितीत हा नवा पूल अडकल्याने तोही आता हेरिटेजच्या होण्याची वेळ आली आहे, असे प्रसाद जाधव म्हणाले.पूलावरही आता अर्धमुंडनचर्चेतून ठोस मार्ग निघत नसल्याने येत्या आठवडाभरात या अर्धवट रेंगाळलेल्या पूलावर छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते डोक्याचे अर्धमुंडन करतील असे संतप्त होऊन फिरोजखान उस्ताद यांनी यावेळी जाहिर केले.

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागroad safetyरस्ते सुरक्षा