शाहू ग्रुपचे अध्यक्ष, भाजपा जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित निमंत्रित जिल्हास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत मुरगूडच्या राणाप्रताप व्हॉलिबॉल संघाने जयसिंगपूर व्हॉलिबॉल संघाचा पराभव करीत सहकारमहर्षी राजे विक्रमसिंह घाटगे चषक पटकाविला. स्पर्धेत मॅन ऑफ द सेरीजचा बहुमान राणाप्रतापचा ओंकार लोकरे यास मिळाला.
स्पर्धा कोल्हापूर जिल्हा व्हॉलिबॉल असोसिएशनच्या मान्यतेने व राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनच्या नियोजनात पार पडल्या.
राणाप्रताप व जयसिंगपूर यांच्यातील अंतिम सामना प्रेक्षकांचे डोळयाचे पारणे फेडणारा असा झाला. अतिशय रोमहर्षक ठरलेला पहिला सेट ३२-३० अशा गुणफरकाने जिंकून राणाप्रताप संघाने जिंकत १-० अशी आघाडी घेतली. मात्र, ही आघाडी राणाप्रतापला दुसऱ्या सेटमध्ये टिकविता आली नाही. जयसिंगपूर संघाने २५-१७ अशा फरकाने दुसरा सेट जिंकून स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले. मात्र, अंतिम तिसऱ्या सेटमध्ये राणा प्रतापच्या सागर पाटील, ओंकार लोकरे, करण मांगले, गजानन गोधडे, करण भोसले, संग्राम मेतकेकर, श्रावण कळांद्रे, अजित गुरव, विवेक चौगले, जीवन गोधडे यांच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर २५- १९ असा तिसरा सेट जिंकत विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेत जयसिंगपूर व्हॉलिबॉल संघास द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. तिसरा क्रमांक आदर्श व्हॉलिबॉल संघ निगवे संघास मिळाला. स्पर्धेत बेस्ट स्मशर-अमित माने (जयसिंगपूर) बेस्ट पासर -हर्षद कांदळकर (निगवे ) बेस्ट लिबेरो- जीवन गोधडे (राणा प्रताप) मॅन ऑफ दि मॅच गजानन गोधडे (राणा प्रताप ) मॅन ऑफ द सिरीज ओंकार लोकरे (राणा प्रताप). पंच म्हणून महेश शेडबाळे व प्रवीण मोरबाळे (कागल ) विनोद रणवरे (मुरगूड ), स्वप्निल पाटील (भोगावती) यांनी काम पाहिले. समालोचन अनिल पाटील यांनी केले.
सुशांत मांगोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बक्षीस समारंभ समरजित घाटगे, दत्तात्रय खराडे, सुनील सूर्यवंशी, संतोष वंडकर, दगडू शेणवी, भाजपा शहर अध्यक्ष बजरंग सोनुले, एस. आर. पाटील, छोटू चौगले, विजय गोधडे, सदाशिव गोधडे, कुंडलिक मेंडके, नवनाथ सातवेकर, अमर चौगले, सुनील कांबळे, भरत लाड, रॉबर्ट फर्नाडिस, संतोष गुजर यांच्या उपस्थितीत झाला.
०८ मुरगूड व्हॉलिबॉल स्पर्धा
फोटो ओळ
मुरगूड (ता. कागल) येथील व्हॉलिबॉल स्पर्धेत राणा प्रताप संघास प्रथम क्रमांकाचे बक्षीस देताना समरजित घाटगे, दत्तात्रय खराडे, संतोष वंडकर, दगडू शेणवी, सुनील सूर्यवंशी व अन्य उपस्थित होेते.