कागल : येथील शाहू सहकारी साखर कारखान्याच्यावतीने येथे सुरू असलेल्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेतील पहिली फेरी पूर्ण झाली असून, दुसऱ्या फेरीस सुरुवात झाली आहे. पै. राणा नलवडे, प्रवीण निकम, सुहास हिंदुळे, अभिजित पाटील, आदींनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत स्पर्धेची पुढील फेरी गाठली आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच आणि राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते पै. राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या स्पर्धेतील पंच म्हणून बाजीराव पाटील, रामा माने, संभाजी मगदूम, आनंदा गायकवाड, अशोक फराकटे, मलकारी पुजारी, शंकर मेडसिंगे, अनिल बाबर, आदी काम पाहत आहेत. निवेदक म्हणून सर्जेराव मोरे काम पाहत आहेत, तर अजित कुलकर्णी, रमेश सणगर, सर्जेराव पाटील, रावसाहेब परीट, नारायण जोशी, अण्णासो गाडेकर, आदी संयोजक म्हणून काम पाहत आहेत. आज झालेल्या काही प्रमुख लढतींतील गटनिहाय विजयी पैलवान असे : ४२ किलो कुमार गट - सौरभ बेनके, वैभव दरी, तानाजी ढेरे. ५२ किलो कुमार गट : महेश भांडवले, हृषिकेश धुळे. ५६ किलो ज्युनिअर गट : विजय जाधव, संतोष हिरुगडे. ६० किलो ज्युनिअर गट : शशिकांत बोंगार्डे, ६५ किलो ज्युनिअर गट : विजय शिंदे, संभाजी घराळ. (प्रतिनिधी)
राणा नलवडे, प्रवीण निकम, हिंदुळे यांची बाजी
By admin | Updated: August 7, 2014 00:18 IST