शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

रामभक्तांचा रथावर पाना-फुलांचा वर्षाव

By admin | Updated: November 23, 2014 23:51 IST

फलटणचा रथोत्सव : दर्शनासाठी भाविकांच्या ठिकठिकाणी रांगा

फलटण : शहर व तालुक्यातील भाविकांचे आराध्य दैवत श्री प्रभू रामचंद्र यांचा रथोत्सव गेल्या साडेतीन शतकांपासून सुरू असलेल्या परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा झाला. शहर व तालुक्यातील रामभक्तांनी रथावर पाना-फुलांचा वर्षाव केला. दरम्यान, रथातील राम-सीतामाईच्या दर्शनासाठी भाविकांनी ठिकठिकाणी रांगा लावल्या होत्या. रथोत्सवानिमित्त आज सकाळी येथील श्रीरामाच्या मंदिरासमोर पानाफुलांनी, नारळाच्या तोरणांनी सजविलेल्या आकर्षक ट्रॅक्टर-ट्रॉलीत राम आणि सीतामाईच्या मूर्ती बसविण्यात आल्या. त्यानंतर नाईक-निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, अनिकेतराजे नाईक-निंबाळकर, सुभद्राराजे नाईक-निंबाळकर यांनी रामरथाची पूजा केली. यावेळी देवस्थान ट्रस्टी, मानकरी उपस्थित होते. अभिषेक व पूजा झाल्यानंतर रामरथ नगरप्रदक्षिणेसाठी निघाला.श्रीराममंदिर, शिंपी गल्ली, शिवशक्ती चौक, उघडा मारुती मंदिर, बारामती चौक, पंचायत समिती, शिवाजी चौक, आंबेडकर चौक, जैन स्तंभ, ज्ञानेश्वर महाराज मंदिर, महात्मा फुले चौक, मारवाड पेठ, बाणगंगा नदीपात्र, मलठण उंबरेश्वर चौक, सद्गुरू हरिबुवा मंदिर, पाचबत्ती चौक, रविवार तालीम, उमाजी नाईक चौक, गजानन चौक येथून जबरेश्वर मंदिरमार्गे रामरथ श्रीराममंदिराजवळ सायंकाळी उशिरा पोहोचला.दरम्यान, रथमार्गावर ठिकठिकाणी रामभक्तांनी रथाचे दर्शन घेतले. ग्रामीण भागातून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. चौकाचौकात स्वागत कमानी, सडा-रांगोळीने रथाचे स्वागत करण्यात आले. नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्षा सारिका जाधव यांच्या हस्ते रामरथाचे स्वागत करण्यात आले. यावेळी नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवकांनी रथाचे दर्शन घेतले. पालिकेच्या वतीने भाविकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. (प्रतिनिधी)