शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

रामलिंग लेणीस्थळाची शासनाकडून अवहेलना

By admin | Updated: September 2, 2014 00:02 IST

पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे : शासनाने लक्ष घालणे गरजेचे

राम करले -- बाजारभोगाव --पळसंबे (ता. गगनबावडा) येथील रामलिंग लेणी पर्यटकांबरोबर आध्यात्मिक लोकांनाही आकर्षित करत आहेत. त्यामुळे शासनाने पर्यटनदृष्ट्या तेथे विकास साधण्याची गरज आहे. मात्र, लोकप्रतिनिधी आणि पर्यटन विभागाच्या दुर्लक्षामुळे या चांगल्या पर्यटनस्थळाची अवहेलना झाली आहे. कोल्हापूर-गगनबावडा या मुख्य रस्त्याला असळज गावानजीक पळसंबे फाटा आहे. फाट्यापासून लेण्यापर्यंत ३ किलोमीटरचा रस्ता आहे. जिथे रस्ता संपतो, तिथे एक आश्रम पाहायला मिळते. २०० फूट अंतरावर गेल्यावर दोन डोंगरांच्या मध्यभागी तयार झालेल्या खोलगट भागामध्ये दाजीपूर अभयारण्यातून घनदाट जंगलातून दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणारा ओढा लागतो. येथेच पळसंब्याची रामलिंग म्हणून ओळखली जाणारी लेणी पाहायला मिळतात. ओढ्यातील पाच लेणी पाहून आपण आश्चर्यचकीत होतो. अखंड दगडामध्ये घडविलेली ही मंदिरे रम्यस्थळी व अफलातून आहेत. अखंड पाषाणाच्या दगडामध्ये घडीव तीन मंदिरे आहेत. पहिल्या मंदिराला एक प्रवेशद्वार आहे. मंदिराचा आकार गोल असून, १० फुटाच्या परिघात अखंड पाषाणावर कोरीव काम केलेले आढळते. दुसऱ्या मंदिराला चार प्रवेशद्वार आहेत. १० फुटाच्या परिघात २० फूट पायापासून ते मनोऱ्यापर्यंत अखंड पाषाणात पश्चिमेकडे मुख्य द्वाराचे तोंड आहे. त्याच्या वरील बाजूला तिसरे मंदिर सर्वांत मोठे आहे. मात्र, तेथे एक गुप्त खोली व बाहेर एक अशी दोन खोल्यांची मंदिरे आहेत. ओढ्याच्या दुसऱ्या बाजूला एक गुहा आढळते. मोठ्या अखंड दगडामध्ये समोरच कातळ दगडावर १२ जोतिर्लिंगाची कोरीव मूर्ती पाहावयास मिळते.