राज्यामध्ये उद्योगधंदे आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आर्थिक कोंडी झाली आहे. प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. लोकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर आहे. असे असताना केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरांत मोठी वाढ करून नागरिकांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या तीन काळ्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या १०० दिवसांपासून शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. केंद्र सरकार चर्चेचा देखावा करून त्यांची फसवणूक करीत आहे. त्यांच्या मागण्या मान्य करून काळे कायदे रद्द करावेत तसेच इंधनाचे व गॅसचे वाढलेले दर त्वरित कमी करावेत या मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले. तसेच धरणे आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवान जाधव, हातकणंगले नगर पंचायतीचे नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर, बाजीराव सातपुते, शकील अत्तार, भैरू पवार, डॉ. विजय गोरड, बाबा राजू कचरे, पिंटू किनिंगे, अमर पाटील, अरुण पाटील, शंकर शिंदे, गोविंद दरक, अनिल धोंगडे, महिपती दबडे, उत्तम पाटील, बाळासो नाईक, आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते हजर होते.
फोटो : हातकणंगले तहसील कार्यालयासमोर उपोषण करताना आमदार राजूबाबा आवळे, तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवान जाधव यांच्यासह कॉंग्रेसचे उपोषणकर्ते.