शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 हॅट्ट्रिकसाठी राजू शेट्टी कुटुंबियांनी कंबर कसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:16 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या कुटुंबातील सदस्य प्रचारात सक्रीय दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत हॅट्ट्रिक करण्यासाठी साऱ्या शेट्टी कुटुंबियांनी कंबर कसली आहे. पत्नी, मुलगा, भाऊ हे नातेवाईक थेट प्रचारात उतरले असून, चळवळीतील प्रमुख शिलेदारही कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रचारात सक्रीय झाल्याचे दिसते.शेट्टी हे शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांचा हायटेक प्रचाराला फाटा असतो. शेट्टी यांचे राजकारणच चळवळीतून पुढे आले आणि त्याला बळ मिळाल्याने शेतकरी हेच त्यांचे प्रचारक आहेत. शेट्टी लोकसभेच्या तिसऱ्यांदा रिंगणात उतरले आहेत. गेल्या १0 वर्षांत ऊस व दूध आंदोलनाच्या माध्यमातून त्यांचा शेतकऱ्यांशी थेट संपर्क आहे. त्यांच्या पत्नी संगीता शेट्टी याही शिरोळसह शेजारील तालुक्यात आंदोलनाच्या माध्यमातून संपर्कात असतात. मुलगा सौरव व भाऊ सुभाष शेट्टी हेही प्रचारात सक्रीय आहेत.राजू शेट्टी । स्वाभिमानी शेतकरी संघटनागेले २0 वर्षे सक्रीय राजकारणात आहेत. विद्यमान खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार म्हणूनही त्यांनी काम केले.पत्नी । संगीता शेट्टीस्वतंत्र व्यासपीठ नसले तरी शेतकरी चळवळीच्या माध्यमातून त्या राजकारणात सक्रीय आहेत. गेली १0 वर्षे त्या चळवळीच्या महिला आघाडीची जबाबदारी सांभाळत आहेत.मुलगा । सौरव शेट्टीगेल्या दोन-तीन वर्षांपासून सौरव ऊस व दूध आंदोलनातून चळवळीत सक्रीय आहेत. संघटनेतील युवकांची मोट बांधत त्यांना सक्रीय करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ते शिरोळ, हातकणंगले, वाळवा तालुक्यांतील प्रचाराची यंत्रणा राबवितात.भाऊ । सुभाष शेट्टीसुभाष शेट्टी हे सक्रीय राजकारणात नसले तरी राजू शेट्टी यांच्या एकूणच चळवळीच्या वाटचालीतील पडद्यामागील भूमिका ते पार पाडतात. २००२ पासूनच्या जिल्हा परिषद निवडणुकीपासून ते शेट्टी यांच्यासाठी जोडण्या लावण्यात आघाडीवर असतात.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक