शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीचे आंदोलन तीव्र करणार : राजू शेट्टी

By admin | Updated: April 4, 2017 17:07 IST

२८ एप्रिलपासून ‘युवा आघाडी’चे जनजागृती रॅली,४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : गेले वर्षभर कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय पातळीवर ‘ऋणमुक्ती अभियान’ राबविले. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्यासाठी अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर आंदोलनाची सरुवात करणार असून, संपूर्ण राज्यभर युवा आघाडीच्या माध्यमातून कर्जमुक्ती जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. तरीही सरकारने दखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करू; पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. कर्जमुक्तीवरून ‘स्वाभिमानी’ आक्रमक झाली असून, सरकारविरोधात थेट रस्त्यावर उतरण्याची तयारी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. आंदोलनाबाबत संघटनेची नेमकी काय भूमिका आहे, याबाबत शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. गेल्या वर्षी अक्षयतृतीयेला तुळजापूर येथून ‘किसान ऋणमुक्ती अभियान’ संपूर्ण देशभर राबविले. त्याच्या माध्यमातून अनेक राज्यांत गेलो. कर्जबाजारी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्याचे नाव, जमीन, जमिनीचा प्रकार, पीक कर्ज कोठून घेतले, थकीत किती, थकबाकी कशामुळे झाली, आदींची माहिती संकलित केली आहे. या महितीसह कर्जमुक्तीसाठी प्रत्येक शेतकऱ्यांकडून अर्ज घेतले आहेत. या आंदोलनाची राज्यपातळीवर व्याप्ती वाढविण्याचा निर्णय ‘स्वाभिमानी’च्या कार्यकारिणीने घेतला आहे. २८ एप्रिल रोजी अक्षयतृतीयेला युवा आघाडीच्या वतीने संपूर्ण राज्यात रॅली काढून शेतकऱ्यांकडून कर्जमाफीचे फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. या रॅलीची सुरुवात २८ एप्रिलला शिरोळ येथून होणार असून ४ मे रोजी कोल्हापुरात सांगता होणार आहे. याच दिवशी कर्जमुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढून सरकारला जाग आणणार आहे. तोपर्यंत सरकारने कर्जमुक्तीबाबत पावले उचलली नाहीत तर ४ मे रोजीच तीव्र आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असेही खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. या आहेत मोर्चातील मागण्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या.स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करा.हंगाम २०१६-१७ मधील ३०० रुपये दुसरा हप्ता द्या. भाऊंनी सरकार म्हणून निर्णय घ्यावाकर्जमुक्ती आंदोलनात राज्यमंत्री सदाभाऊ खोत तुमच्याबरोबर उतरणार का? याविषयी बोलताना शेट्टी म्हणाले, सदाभाऊ मंत्री असल्याने त्यांच्यावर आंदोलनाची मर्यादा आहे; पण त्यांनी सरकार म्हणून निर्णय घ्यावा. आम्ही रस्त्यावर उतरण्याचे काम करणार.