शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टी चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 16:36 IST

मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. त्यामुळे शेतकरी, कार्यकर्त्यांची गाठीभेटी हीच माझ्यासाठी विश्रांती आहे. शेतकऱ्यांचे चेहरे आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळातून मला अविरतपणे काम करण्याची ऊर्जा मिळते. आता लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये महाआघाडी उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन दिवसांत जाणार असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगितले.

ठळक मुद्देराजू शेट्टी चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणारशेतकरी, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी हीच विश्रांती

कोल्हापूर : मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. त्यामुळे शेतकरी, कार्यकर्त्यांची गाठीभेटी हीच माझ्यासाठी विश्रांती आहे. शेतकऱ्यांचे चेहरे आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळातून मला अविरतपणे काम करण्याची ऊर्जा मिळते. आता लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये महाआघाडी उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन दिवसांत जाणार असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगितले.खासदार शेट्टी म्हणाले, गेल्या महिन्याभरापासून निवडणुकीच्या रणधुमाळीत दिवस कसा जायचा हेच समजत नव्हते. मागील १५ दिवसांत रोज तीन ते चार तासच झोप मिळायची. रोज पहाटे पाच वाजता माझा दिवस सुरु होतो. काल, मंगळवारी मतदान झाल्यानंतर काहीसा निवांत झालो. बुधवारी सकाळी साडेसात वाजता उठलो. घरी भेटण्यासाठी कार्यकर्ते आले होते. त्यांच्याशी चर्चा करुन मतदारसंघातील विवाह तसेच अन्य समारंभासाठी उपस्थिती लावली.

दिवसभर विविध गावांतील शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील विविध मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पुढील काही दिवस दौरा करणार आहे.

विश्रांतीसाठी मी कधीच सुटी घेऊन बाहेर जात नाही. शेतकरी आणि कार्यकर्त्यांना भेटणे, त्यांच्याशी संवाद साधण्यातून मला विश्रांती मिळते. ऊसदर आंदोलनावेळी अनेकदा ताणतणाव यायचा. त्याच्या तुलनेत निवडणुकीच्या कालावधीतील ताणतणाव कमी होता. संयमाने वाटचाल आणि विरोधकांना सामोरे गेल्याने या तणावाचा परिणाम माझ्यावर झाला नाही. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaju Shettyराजू शेट्टीhatkanangle-pcहातकणंगले