शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

राजर्षी शाहू जयंतीला व्यापक स्वरूप देऊया

By admin | Updated: June 20, 2016 00:54 IST

मेळाव्यात निर्धार : शोभायात्रेसाठी तालीम, संस्थांनी देणगी नाकारत समितीलाच देणगी जाहीर केली

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीला यावर्षी व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार रविवारी शाहूप्रेमी तालीम आणि संस्थांनी केला. शाहू जयंती लोकोत्सव समितीतर्फे शोभायात्रेसाठी देण्यात येणारी देणगी विनम्रपणे नाकारीत शहरातील तालीम, संस्थांनी स्वत:च देणगी जाहीर करून ती समितीकडे सुपूर्द करून शाहूविचारांची बांधीलकी जोपासली. प्रतिवर्षाप्रमाणे रविवारी (दि. २६) राजर्षी शाहू जयंती सर्वत्र साजरी होत आहे. ही जयंती न होता लोकोत्सव व्हावा, या पार्श्वभूमीवर शहरातील तालीम संस्था, क्लब, तरुण मंडळे, शाहूप्रेमी विचारांचे कार्यकर्ते, आदींचा मेळावा छत्रपती राजाराम टिंबर मार्केट येथील शिंदे लॉन येथे आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष पै. बाबा महाडिक होते. प्रमुख उपस्थिती राजू सावंत, अनिल चौगुले, डॉ. संदीप पाटील, बी. जी. पाटील, कृष्णात पाटील, शाहीर शहाजी माळी, आदींची होती. राजर्षी शाहू महाराजांची जयंती सोहळ्याचे स्वरूप मोठे व्हावे व त्याचा भव्यदिव्यपणा राज्यभर पसरावा, याकरिता समितीतर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून यामध्ये ‘पाणी वाचवा, बेटी बचाव,’ आदी समाजप्रबोधन करणारे फलक आणि बैलगाड्या सहभागी होणार आहेत. या यात्रेत चित्ररथासह सहभागी होण्यासाठी बाबा महाडिक यांनी शहरातील सर्व तालीम संस्थांना आर्थिक देणगी देण्याचा मानस व्यक्त केला होता; परंतु ही देणगी रविवारी तालीम संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी न स्वीकारता उलट स्वत:हून देणगी जाहीर करीत ती समितीकडे दिली. राजू सावंत म्हणाले, शाहूंचे सर्व क्षेत्रांतील कार्य सर्वदूर पोहोचविण्यासाठी तालीम, संस्थांपर्यंत जाण्याचा बाबा महाडिक यांचा उद्देश स्तुत्य आहे. त्याला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळून हा लोकोत्सव घराघरांत साजरा होईल. सुधर्म वाझे म्हणाले, व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून शाहूंच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजूषा तयार करून तिचा प्रसार करावा. डॉ. पाटील यांनी शाहूकालीन वास्तूंविषयी शाहूप्रेमींनी सविस्तर माहिती घेऊन ती समाजातील सर्व घटकांना द्यावी, असे आवाहन केले. अनिल चौगुले यांनी शाहूंचे विचार आत्मसात करण्याची गरज असून, प्रत्येकाने स्वत: महाराजांचा इतिहास समजून घेऊन किमान आपल्या शेजाऱ्याला सांगण्याचे कर्तव्य पार पाडावे असे सांगितले.