शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
3
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
4
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
5
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
6
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
7
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
8
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
9
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
10
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
11
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
12
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
13
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
14
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
15
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
16
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
17
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
18
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
19
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
20
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...

कोल्हापुरात होणार राजर्षी शाहू मराठा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:03 IST

कोल्हापूर : महाराष्ट्रात प्रथमच ‘राजर्षी शाहू मराठा महोत्सव’ कोल्हापुरात २३ ते २६ जानेवारी २०१९ या कालावधीत भव्य प्रमाणात साजरा ...

कोल्हापूर : महाराष्ट्रात प्रथमच ‘राजर्षी शाहू मराठा महोत्सव’ कोल्हापुरात २३ ते २६ जानेवारी २०१९ या कालावधीत भव्य प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.या महोत्सवाच्या नियोजनासाठी शाहू स्मारक भवनात अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी वसंत मुळीक म्हणाले, महाराष्ट्रात अशा प्रकारचा महोत्सव झालेला नाही. जानेवारीमध्ये दसरा चौक मैदान आणि शाहू स्मारक भवन येथे एकत्रित असा भव्य प्रमाणात महोत्सव साजरा करण्यात येईल. त्यासाठी १०० स्टॉल असणार आहेत. या महोत्सवात शेती, ग्रंथ, शाहिरीसह भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी, नामवंत वक्ते यांची व्याख्याने असे विविध कार्यक्रम घेण्यात येतील. यासाठी घरोघरी व ग्रामीण भागात या महोत्सवाची माहितीपत्रके वाटण्यात येतील. मराठा महासंघातर्फे या वेळेला सुमारे २० हजार दिनदर्शिकांचे प्रकाशन करून या माध्यमातून महोत्सवाची जनजागृती करण्यात येणार आहे. विविध समित्याही स्थापन केल्या जातील.महोत्सवात एक स्टॉल मराठा स्वराज्य भवनासाठी असावा. तसेच पहिल्या दिवशी दिंडीचे आयोजन करावे आणि सहभाग घेतलेल्यांना मराठा समाजातर्फे प्रशस्तिपत्र किंवा चषक देऊन त्यांचा गौरव करावा, अशा सूचना उपस्थितांनी केल्या.यावेळी डॉ. संदीप पाटील, सी. एम. गायकवाड, दीपा डोणे, शिवाजी मोरे, प्रताप साळोखे, अनिल चव्हाण, किशोर डवंग, विश्वास चौगुले, आदींनी सूचना मांडल्या. बैठकीस शशिकांत पाटील, उत्तम जाधव, चंद्रकांत चव्हाण, डॉ. शिवाजीराव हिलगे, संभाजीराव जगदाळे, हेमंत दळवी, नितीन पाटील, अशोक पोवार, अजित सासने, मिलिंद ढवळे-पाटील, इंद्रजित माने, प्रताप साळोखे, सरदार पाटील, शैलजा भोसले, मंगल कुºहाडे, संग्रामसिंह निंबाळकर, अवधूत पाटील, आदी उपस्थित होते.