शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

राजर्षी शाहूंची दुर्मीळ चित्रफीत सापडली--दर्शनाने करवीरवासीय भारावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 22:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांना आजपर्यंत छायाचित्रांद्वारे अनेकांनी पाहिले आहे; पण पहिल्यांदाच त्यांची चित्रफीतही सापडली आहे. या दुर्मीळ चित्रफितीमधील राजर्षी शाहू महाराज यांना पाहून करवीरवासीय शुक्रवारी सायंकाळी भारावले.

ठळक मुद्देजयजयकाराने भवानी मंडप दुमदुमला

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांना आजपर्यंत छायाचित्रांद्वारे अनेकांनी पाहिले आहे; पण पहिल्यांदाच त्यांची चित्रफीतही सापडली आहे. या दुर्मीळ चित्रफितीमधील राजर्षी शाहू महाराज यांना पाहून करवीरवासीय शुक्रवारी सायंकाळी भारावले. यानंतर राजर्षी शाहूंच्या जयजयकाराने भवानी मंडपाचा परिसर दुमदुमून गेला.शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे भवानी मंडपाच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात ही दुर्मीळ चित्रफीत दाखविण्यात आली. यात सन १९२२ मध्ये दिल्ली दरबारी प्रिन्स आॅफ वेल्स यांच्या भेटीसाठी राजर्षी शाहू महाराज गेले होते. त्यावेळची ही चित्रफीत असून, ती पाहून करवीरवासीय भारावून गेले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, महाराणी ताराराणी की जय, राजर्षी शाहू महाराज की जय, अशा घोषणा देत उभे राहून अभिवादन केले. दरम्यान, याबाबत चित्रफितीबाबत शाहीर राजू राऊत यांनी सांगितले की, माझ्या संग्रहामध्ये छत्रपती घराण्याशी संबंधित दुर्मीळ छायाचित्रे, छत्रपती राजाराम महाराज यांची चित्रफीत आहे. राजर्षी शाहू महाराज यांची चित्रफीत असावी, अशी इच्छा होती. त्यासाठी माझा विविध मित्रांच्या माध्यमातून शोध सुरू होता. यात माझे सहकारी राम यादव यांनी ‘कोलोनियल फिल्म आॅफ इंडिया’ या संकेतस्थळाची माहिती दिली. मात्र, त्यावरील राजर्षी शाहूंची चित्रफीतच नेमकी नाहीशी झाली होती. यावर लंडनमधील राम कर्णिक, रिचा वोरा त्यांना संबंधित चित्रफितीचा शोध घेण्याबाबत ई-मेल केले. राजर्षींना एका नजरेत तरी पाहण्यासाठी आमची धडपड सुरू होती. यानंतर गुरुवारी (दि. २१) रात्री प्रशांत आयरेकर हे इंटरनेटवर सर्चिंग करताना त्यांना यामध्ये संबंधित दुर्मीळ चित्रफीत सापडली. ती अजित आयरेकर यांनी उपलब्ध करून दिली. अशा पद्धतीने पहिल्यादांच चित्रफितीद्वारे राजर्षी शाहू महाराज यांचे दर्शन घडले. ही चित्रफीत सन १९२२ मधील असून यात राजर्षी शाहू महाराज यांच्याबरोबर थोरले युवराज छत्रपती राजाराम हेही दिसतात.कोल्हापुरात शुक्रवारी भवानी मंडप परिसरात राजर्षी शाहू महाराज यांची दुर्मीळ चित्रपीत दाखविण्यात आली. करवीरवासीयांना पहिल्यांदाच चित्रफितीद्वारे राजर्षी शाहूंचे दर्शन घडले.  कोल्हापुरात शुक्रवारी भवानी मंडप परिसरात राजर्षी शाहू महाराज यांची दुर्मीळ चित्रफीत दाखविण्यात आली. यावेळी उपस्थित करवीरवासीय, नागरिकांनी उभे राहून लोकराजांना अभिवादन केले.