शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 राजारामपुरीत संमिश्र वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:31 IST

कोल्हापूर : शहरामध्ये महाद्वार रोडनंतर दुसरी व्यापारी पेठ व उच्चभ्रू वसाहत म्हणजे ‘राजारामपुरी’ होय. अशा या पहिल्या ते १४ ...

कोल्हापूर : शहरामध्ये महाद्वार रोडनंतर दुसरी व्यापारी पेठ व उच्चभ्रू वसाहत म्हणजे ‘राजारामपुरी’ होय. अशा या पहिल्या ते १४ व्या गल्लीपर्यंत विस्तारलेल्या राजारामपुरीची स्थापना छत्रपती राजाराम महाराजांनी केली. १९८० ते २००४ सालापर्यंत या परिसराची ओळख स्व. दिग्विजय खानविलकर यांचा बालेकिल्ला म्हणून होती; मात्र आमदार सतेज पाटील यांनी त्यांना पराभूत केल्यानंतर यातील अनेक महत्त्वाचे कारभारी माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार पाटील यांच्याकडे विखुरले गेले; त्यामुळे या दोन्ही नेत्यांना मानणारा गट येथे आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांची वानवा होती. यंदा मात्र याच परिसरातील सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांसह आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांची फौज मंडलिकांचा प्रचार आक्रमकपणे करीत आहेत, तर खासदार महाडिक यांच्या प्रचारात मोजकेच कारभारी अंतर्गत प्रचार करण्यात मग्न आहेत; त्यामुळे कार्यकर्ते आणि मतदारांचा पत्ता लागत नाही.राजारामपुरीचा पसारा अगदी पहिली गल्ली ते १४ वी गल्ली, सायबर चौक, माउली पुतळा परिसर, शाहूनगर, प्रतिभानगर, टाकाळा, माळी कॉलनी, काटकर माळ, आदीपर्यंत पोहोचला आहे. यात मंडलिक पार्क, एस. टी. कॉलनी, शारदा हौसिंग सोसायटी, भारत हौसिंग सोसायटी, विश्वनाथ हौसिंग सोसायटी, अशा एक ना अनेक सोसायटींमुळे ही वसाहत अपार्टमेंट संस्कृतीचा एक नमुना बनून गेली. येथे प्रभाग क्रमांक ३६ ते ४२ पर्यंतचा सहा प्रभागांचा समावेश झाला. त्यात सुमारे ४० हजारांहून अधिक मतदान या परिसरात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना-भाजपमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्याची स्पर्धाच लागली आहे; त्यामुळे अक्षरश: एका उमेदवाराचे समर्थक भेटून आल्यानंतर काही वेळातच दुसऱ्या उमेदवाराचे समर्थक मतदारांच्या दारात असतात; त्यामुळे राजारामपुरीत काटोंकी टक्कर पाहण्यास मिळत आहे. दोन्ही बाजंूनी कॉर्नर सभा, प्रचारफेरी, घराघरांतून मतदान आमच्याच उमेदवाराला द्या, असे आवाहन केले जात आहे. त्यात दूरच्या नातेवाइकांची ओळखही सांगितली जात आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांनाही मानणारा एक वर्ग या परिसरात आहे. त्याचा फायदा प्रा. मंडलिक यांना होईल, असा कयास कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. परिसरातील सकल मराठा समाज दोन्हीकडे विखुरला आहे.प्रभाग ३६ मध्ये नगरसेवक संदीप कवाळे (काँग्रेस), प्रभाग क्र. ३७ मध्ये नगरसेविका प्रतिज्ञा निल्ले-उत्तुरे (शिवसेना), प्रभाग क्र. ३८ - नगरसेविका सविता भालकर (ताराराणी आघाडी), प्रभाग क्र- ३९ मध्ये मुरलीधर जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाग क्र. ४० विलास वास्कर (ताराराणी आघाडी), प्र. ४१ भाग्यश्री शेटके (ताराराणी आघाडी) यांचा समावेश आहे.धनंजय महाडिक यांच्या बाजूने कोण?माजी महापौर दीपक जाधव, नगरसेवक मुरलीधर जाधव, नगरसेवक विलास वास्कर, नगरसेवक संदीप कवाळे, रहिम सनदी, जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, माजी नगरसेवक काका पाटील, महादेव पाटील, नितीन पाटील, हेमंत पाटील, संध्या घोटणे, राजू पोटे, संग्राम सूर्यवंशी, पद्मावती पाटील, दीपिका जाधव, सुरेखा जाधव, भैया शेटके आहेत.संजय मंडलिक यांच्या बाजूने कोण?नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, माजी नगरसेवक रघुनाथ टिपुगडे, महेश उत्तुरे, दुर्गेश लिंग्रस, कमलाकर जगदाळे, दीपक चव्हाण, भाजप जिल्हा सरचिटणीस विजय जाधव, अंकुश निपाणीकर, विजय सूर्यवंशी, जीवन कदम आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक