शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

‘राजाराम’साठी मोर्चेबांधणी सुरू

By admin | Updated: October 28, 2014 00:19 IST

निवडणूक हालचाली गतिमान : सत्तारूढ गटाचा गावनिहाय संपर्क

रमेश पाटील - कसबा बावडा -येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सत्तारूढ गटाने गावनिहाय संपर्क मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्याने आमदार महादेवराव महाडिक यांनी आपले लक्ष्य पुन्हा राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे केंद्रित केले आहे.नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार महाडिक यांनी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कारखान्याच्या निवडणुका होतील, असे म्हटले होते; परंतु अद्याप कारखान्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कच्च्या-पक्क्या याद्या तयार करण्याच्या सूचना मिळालेल्या नाहीत. नोव्हेंबरमध्ये अशा सूचना मिळाल्यास फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये कारखान्याच्या निवडणुका होऊ शकतात. दरम्यान, निवडणूक केव्हाही होऊ दे. आपण आपले सावध असलेले बरे, या हेतूने सत्तारूढ गटाकडून गावनिहाय संपर्क मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. ‘राजाराम’चे १२२ गावांत कार्यक्षेत्र आहे. करवीर तालुक्यातील ३०, पन्हाळा तालुक्यातील १८, शाहूवाडीतील १०, गगनबावडा १४, हातकणंगले ३२, राधानगरी १४ व कागल तालुक्यातील फक्तचार गावांचा समावेश आहे. कारखान्याचे एकूण १५ हजार ८५२ सभासद आहेत. त्यापैकी अनुउत्पादक संस्था सभासद १३६ आहेत. करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, हातकणंगले, राधानगरी, कागल अशा सात तालुक्यांत कार्यक्षेत्र असल्यामुळे निवडणुकीचा प्रचार दौरा करताना सर्वांचीच दमछाक होते.