शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राजाभाऊंच्या भेळने गाठली पन्नाशी...

By admin | Updated: December 6, 2015 01:34 IST

खवय्यांची प्रथम पसंती : कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग

मुरलीधर कुलकर्णी / कोल्हापूर इथल्या खवय्यांची प्रथम पसंती असलेली खाऊ गल्लीत मिळणारी राजाभाऊंची भेळ कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीचा जणू अविभाज्य भाग बनली आहे. ५ डिसेंबर १९६५ रोजी स्वर्गीय राजाभाऊंनी सुरू केलेली ही भेळ आज अर्धशतकाची झाली आहे. साधारण १९६0-६२च्या सुमारास सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील ढवळी या छोट्याशा खेड्यातून राजाभाऊ शिंदे नावाचा पंचवीसीतला एक तरुण कामाच्या शोधात कोल्हापुरात आला. पोटापाण्यासाठी काय करावे या विवंचनेत असलेल्या त्या तरुणाने सुरुवातीचे काही दिवस अनेक छोटी, मोठी कामे केली; पण कशातच जम बसेना. शेवटी एक दिवस त्याच्या डोक्यात एक कल्पना आली अन् लगेच तो कामाला लागला. सायकलवरून फिरून कोल्हापूरच्या गल्लीबोळांतून भडंग विकण्याचा व्यवसाय त्यानं सुरू केला. या भडंगाच्या चवीचंलोकांना जणू वेडच लागलं. लोक त्याच्या येण्याची वाट पाहू लागले. थोडं अर्थार्जन झाल्यावर त्यानं भवानी मंडपाच्या कमानीजवळ एका छोट्याशा हातगाडीवर आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. भडंगाबरोबरच कांदा, कोथिंबीर, गोड चिंचेचं पाणी, शेव आणि चिवडा घातलेला भेळ नावाचा एक नवाच पदार्थ त्यानं कोल्हापूरकरांपुढं सादर केला अन् बघता-बघता कोल्हापूरकरांना त्याच्या या भेळेनं अक्षरश: वेड लावलं. या पदार्थाची लोकप्रियता पाहून शहरात पुढे अनेकांनी भेळेच्या गाड्या सुरू केल्या; पण मोठ्या मनाच्या राजाभाऊंनी कधीच कुणाला अटकाव केला नाही. आज त्यांची ही ‘आॅल इंडिया स्पेशल भेळ’ पन्नास वर्षांची यशस्वी वाटचाल संपवून ५१व्या वर्षांत पदार्पण करतेय. त्यांची दोन मुले रवींद्र आणि अरविंद आज व्यवसाय सांभाळत आहेत. पन्नास वर्षांपूर्वी तुटपुंज्या भांडवलावर सुरू केलेल्या त्यांच्या व्यवसायात आज लाखोंची उलाढाल होतेय; पण हे सगळं पाहायला आज राजाभाऊ मात्र आपल्यात नाहीत, याचंच त्यांच्या परिवारासह कोल्हापूरच्या खवय्यांनाही दु:ख होतंय.