शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

टोल आंदोलनाप्रमाणे लढा उभारूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:48 IST

कोल्हापूर : राज्यात कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा सुरू करण्यास मान्यता देण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद कोल्हापुरात उमटले. कोल्हापुरातील टोल आंदोलनाप्रमाणे आंदोलन उभे करून या निर्णयाला विरोध करूया, असा सूर शुक्रवारी शिक्षक व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींकडून उमटला. या निर्र्णयाविरोधात आज, शनिवारी दुपारी ४ वाजता शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्याचे ठरले.मंगळवार पेठेतील ...

कोल्हापूर : राज्यात कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा सुरू करण्यास मान्यता देण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद कोल्हापुरात उमटले. कोल्हापुरातील टोल आंदोलनाप्रमाणे आंदोलन उभे करून या निर्णयाला विरोध करूया, असा सूर शुक्रवारी शिक्षक व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींकडून उमटला. या निर्र्णयाविरोधात आज, शनिवारी दुपारी ४ वाजता शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्याचे ठरले.मंगळवार पेठेतील हिंदू एकता आंदोलनच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत शिक्षण वाचवा नागरी कृती समितीची स्थापना केली. या समितीचे समन्वयक म्हणून गिरीष फोंडे व रमेश मोरे यांची नियुक्ती केली.यावेळी फोंडे म्हणाले, शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात कोल्हापूरमधून व्यापक आंदोलन उभारणे आवश्यक आहे. शिक्षक नेते प्रभाकर आरडे म्हणाले, हा प्रश्न सुटण्यासाठी न्यायालयात जाऊन चालणार नाही तर जनआंदोलन पेटविले पाहिजे. तसेच एखादी परिषद घेऊन सरकारला इशारा देऊया. प्रा. सुभाष जाधव म्हणाले, या निर्णयाविरोधात जनआंदोलन उभारण्याची गरज असून यामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभागी होण्याची गरज आहे.संभाजी जगदाळे म्हणाले, या विरोधातील आंदोलनात सर्वसामान्य माणूस उतरल्याशिवाय ते यशस्वी होणार नाही. यावेळी चंद्रकांत यादव, शिक्षक नेते दादा लाड, राजेश वरक, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, गणी आजरेकर, राजाराम वरुटे, आदींनी सूचना मांडल्या. यावेळी अतुल दिघे, किशोर घाटगे, प्रसाद जाधव, चंद्रकांत बराले, बाळासाहेब विभूते, दिलीप माने, आदी उपस्थित होते.आंदोलनाची जबाबदारी घ्यावीनुसते टोलसारखे आंदोलन करू, असे म्हणून चालणार नाही तर त्यासाठी लावलेल्या यंत्रणेप्रमाणेच यंत्रणा उभी करावी लागणार आहे. आंदोलनाची जबाबदारी कुणीतरी घेऊन रोज सामान्य माणसांपर्यंत पोहोचले पाहिजे, तरच त्याला यश येईल, असे रमेश मोरे यांनी सांगितले.३४ शाळा बंदच्या निर्णयाचा निषेधजिल्ह्यातील ३४ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सरकारच्या निषेधाचा ठराव फोंडे यांनी मांडला. त्याला सर्वांनुमते मान्यता दिली.जागा धनदांडग्यांना मिळणारया कायद्यानुसार सरकारला सार्वजनिक जागांचे खासगीकरण करून घ्यायचे आहे. यामुळे या जागा धनदांडग्यांच्या घशात जाणार आहेत, असा आरोप आरडे यांनी केला.