शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठवा

By admin | Updated: December 22, 2015 00:53 IST

कणेगाव येथे महामार्ग रोखला : शर्यत बचाव कृती समितीचे आंदोलन

किणी : प्राणीमित्र संघटनेच्या मागणीनुसार घातलेल्या बैलगाडी शर्यतींवरील बंदी तत्काळ उठवावी, या मागणीसाठी कणेगाव (जि. सांगली) येथे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.२0११ मध्ये प्राणीमित्र संघटनेच्या मागणीनुसार बैलगाडी शर्यतींवर बंदी घालण्यात आली आहे. ती उठविण्याची मागणी शेतकरी वारंवार करीत आहेत. यासाठी अनेक ठिकाणी विविध आंदोलने केली. मात्र, शासनाने ही बंदी उठविली नाही. हा केंद्र शासनाच्या आखत्यारीतील विषय असल्याने चालू अधिवेशनात कायदा करून शर्यती पूर्ववत सुरू करण्यासाठी महामार्गावर रास्ता रोको केला. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, अखिल भारतीय शेतकरी शर्यत बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रसाद धर्माधिकारी, महाराष्ट्र रेंसिंग असोसिएशन तर्फे बैलगाड्यांसह शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरून घोषणाबाजी केली. सुरुवातीला हे आंदोलन किणी येथे होणार होते, तशी घोषणाही केली. मात्र, पूर्वानुभव पाहता आंदोलन कुठेही होईल, असे गृहित धरून कोल्हापूर व सांगली पोलीस दलात दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलकांनी पोलिसांशी चर्चा करून कणेगाव (जि. सांगली) येथे शांततेत आंदोलन केले. या आंदोलनासाठी कोल्हापूरचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक चैतन्य एस. व सांगलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह जलद कृती दलाचे सुमारे अडीचशेहून अधिक पोलीसांचा ताफा येथील बंदोबस्तासाठी तैनात केले होते.शेतकऱ्यांचा इशारा : चार जिल्ह्यांचा सहभागया आंदोलनासाठी सांगली, कोल्हापूर, साताऱ्यासह बेळगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाने बंदी उठविली नाही, तर पुढील काळात आंदोलन तीव्र करू, असा इशारा जेष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला.