शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त भागातील ६५५ टन कचरा उठाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:24 IST

कोल्हापूर : महानगरपालिका आरोग्य विभागाने पूरबाधित क्षेत्रातील राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत गेल्या तीन दिवसांत ६५५ टन कचरा व गाळ उठाव ...

कोल्हापूर : महानगरपालिका आरोग्य विभागाने पूरबाधित क्षेत्रातील राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत गेल्या तीन दिवसांत ६५५ टन कचरा व गाळ उठाव करण्यात आला. स्वच्छता, औषध फवारणी, तसेच रस्ते पाण्याने धुण्याच्या मोहिमेत महानगरपालिकेचे दोन हजार कर्मचारी राबत आहेत. दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिकेचे ३६ कर्मचाऱ्यांचे एक पथक कोल्हापुरात मंगळवारी सायंकाळी दाखल झाले आहे.

रविवारच्या मोहिमेत १०० टन, सोमवारच्या मोहिमेत ३०० टन, तर मंगळवारच्या स्वच्छता मोहिमेत २५५ टन कचरा व गाळ उठाव करण्यात आला. शहरातील पूरबाधित क्षेत्रात साचलेला गाळ व कचरा उठाव, औषध व धूर फवारणीची ही मोहीम शुक्रवारअखेर सुरू राहणार आहे.

महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी दुपारी स्वच्छता मोहिमेदरम्यान संवाद साधला. यावेळी बलकवडे यांनी स्वच्छता मोहिमेदरम्यान ताराबाई पार्क, कदमवाडी, कुंभार गल्ली, कपूर वसाहत, साळोखे पार्क कदमवाडी या ठिकाणी पाहणी केली. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून आपल्या परिसरात स्वच्छता, औषध व धूर फवारणी करण्यात येते का याची खात्री करून घेतली.

शाहूपुरी कुंभार गल्ली येथील धोकादायक घरामधील नागरिकांना तातडीने निवारा केंद्राच्या ठिकाणी स्थालांतरित करण्याच्या सूचना बलकवडे यांनी उपशहर अभियंता बाबूराव दबडे यांना दिल्या.

- मुंबईची दोन जेट मशीन कोल्हापुरात-

मुंबई महानगरपालिकेकडून कोल्हापूरला दोन जेट कम सक्शन वाहने उपलब्ध करून‍ दिली आहेत. या सक्शन वाहनाद्वारे शहरातील प्रमुख ड्रेनेज लाईन साफ करणे व चोकअप काढण्याचे काम महापालिकेने युद्धपातळीवर सुरू केले.

- नवी मुंबईहून ३६ कर्मचाऱ्यांचे पथक दाखल -

प्रशासक बलकवडे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना फोनवरून महानगरपालिका क्षेत्रातील पूर ओसरू लागल्याने स्वच्छतेसाठी नवी मुंबई महानगरपालिकेची पथक पाठवून सहकार्य करण्याबाबत चर्चा केली होती. त्यानुसार ३६ कर्मचाऱ्यांचे पथक कोल्हापुरात दाखल झाले आहे.