शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

पावसाचा जोर वाढला, पंचगंगा इशारा पातळीच्याही खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:24 IST

कोल्हापूर : चार दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने गुरुवारी रात्रीपासून जोर धरल्याने चिंता वाढली आहे. शुक्रवारी दिवसभर थांबून थांबून पावसाच्या ...

कोल्हापूर : चार दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने गुरुवारी रात्रीपासून जोर धरल्याने चिंता वाढली आहे. शुक्रवारी दिवसभर थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. पावसाने पुनरागमन केल्याने महापूर ओसरण्याचा वेगही कमी झाला असून मदतकार्यातही अडथळे येत आहेत. पूर ओसरलेल्या भागात या पावसाने चिखलाचा काला झाल्याचे दिसत आहे. दरम्यान पंचगंगा नदी शुक्रवारी दुपारनंतर ३९ फूट या इशारा पातळीच्या खालून वाहू लागली. भोगावती वगळता सर्वच नद्या अजूनही पात्राबाहेरूनच वाहत असल्याने नदीकाठ पाण्याखालीच आहे.

जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या तीन दिवसांच्या ढगफुटीसारख्या पावसाने महापुराचे सर्वच रेकॉर्ड मोडले. सोमवारपासून पावसाने उसंत घेतल्याने महापुराचा विळखा वेगाने सैल होत होता; पण दोन-तीन दिवसांच्या उघडिपीनंतर लगेच गुरुवारी रात्रीपासून पावसाने दमदार सुरुवात केल्याने पुरातून सावरण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नावर पाणी फिरू लागले आहे. अजूनही जिल्ह्यातील ३२ बंधारे पाण्याखाली आहेत. ३० च्या वर वाहतूक मार्ग बंद आहेत, शिरोळ तालुक्यातील अनेक गावांना अजूनही पुराच्या पाण्याचा वेढा कायम आहे, अशा परिस्थितीत पावसाची उसंत अपेक्षित होती. पूर ओसरेल तसे लोक निवारागृहातून घराकडे परतत होते, स्वच्छता सुरू होती; पण शुक्रवारी दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे या सर्वांच्या प्रयत्नांत व्यत्यय आला आहे. पूरग्रस्त भागात आधीच चिखलाचे साम्राज्य पसरले आहे, या पावसाने त्याचा अक्षरश: काला झाला असून तो रस्त्यावर पसरल्याने दैन्यावस्थेत आणखी भर पडली आहे.

कसबा बावडा ते शिये मार्ग खुला

पंचगंगा नदीची पाणीपातळी राजाराम बंधाऱ्यावर शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता ३७.७ फुटांपर्यंत खाली आली आहे. पाणी कमी झाल्याने कसबा बावडा ते शिये या मार्गावरील वाहतूक आठवडाभरानंतर सुरू झाली आहे; पण अजूनही रस्त्यावर गाळ व शेवाळ असल्याने रस्ता निसरडा झाला आहे.

तालुकानिहाय पाऊस (मि.मी.मध्ये)

हातकणंगले- १.०८ , शिरोळ- ०.०७, पन्हाळा- १०.०४, शाहूवाडी- १३.०६, राधानगरी -११.०९, गगनबावडा- २५.०८ , करवीर- ०५, कागल- ३.०२, गडहिंग्लज- १.२, भुदरगड- ११.०९, आजरा- ७.०४ व चंदगड- १०.०९

धरणातील विसर्ग (क्युसेकमध्ये)

राधानगरी १४००, दूधगंगा ४६००, वारणा १४३८९, कासारी १२५०, कडवी ८३५, चिकोत्रा ५६०, कोदे ७४३

चौकट

शिरोळ तालुक्यात पंचगंगा इशारा पातळीवरच (कंसात इशारा पातळी)

शिरोळ तालुक्यातील राजापूर, नृसिंहवाडी, शिरोळ, इचलकरंजी, तेरवाड हे पाचही बंधारे धोक्याच्या खाली आले असले, तरी अजूनही पंचगंगा इशारा पातळीवरूनच वाहत असल्याने पूरस्थिती कायम आहे. या बंधाऱ्यावरील सध्याची पाणीपातळी अशी आहे. राजापूर ५५ (५३), नृसिंहवाडी ६९ (६५), शिरोळ ६९ (७४), इचलकरंजी ७० (६८), तेरवाड ६७ (७१)

प्रमुख धरणातील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

धरण पाणीसाठा टक्केवारी

राधानगरी ८.२८ ९९

तुळशी ३.०९ ८९

वारणा ३१.०१ ९०

दूधगंगा २१.४५ ८४