शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

पावसाचे आगरही दुष्काळाच्या छायेमध्ये

By admin | Updated: September 6, 2015 22:54 IST

दहा तलाव कोरडे : शिराळा तालुक्यात बरसला निम्माच पाऊस, चांदोली धरणाचा सांडवा दहा वर्षांत पहिल्यांदाच कोरडा

विकास शहा= शिराळा  शिराळा तालुका हा पावसाचे आगर. मात्र यावेळी सप्टेंबर महिना आला तरीही तालुक्यात निम्म्यापेक्षाही कमी पाऊस झाल्याने १० पाझर तलाव कोरडे पडले आहेत, तर इतर २९ तलावात ५० टक्केसुद्धा पाणीसाठा नाही.पावसाच्या दडीमुळे चांगली उगवण झालेली पिके करपू लागली आहेत, तर जनावरांना वैरण व पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. चांदोली धरणातून यावर्षी पूजनासाठी फक्त पाणी सोडण्यात आले. गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच हा सांडवा कोरडा आहे.तालुक्यात ५४०९० हेक्टर क्षेत्र पिकाखालील आहे. त्यापैकी जिरायती ४७४७६, तर बागायती क्षेत्र ६६१८ हेक्टर आहे. खरीप हंगामात २६९५० हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. धूळवाफेवर भात पेरण्या झाल्या, यानंतर काही प्रमाणात पाऊस पडला. जुलै महिनाअखेर पिकांना जीवदान मिळेल, असा पाऊस झाला होता. त्यामुळे दुबार पेरण्यांचे संकट टळले होते. मात्र मुसळधार पाऊस एकदाही न झाल्याने पाझर तलाव, धरणांमध्ये पाणीसाठा होऊ शकला नाही.मात्र आॅगस्ट महिना जवळजवळ कोरडाच गेला. त्यामुळे ४९ पाझर तलावांपैकी निगडी (जुना), बेलदारवाडी, कोंडाईवाडी नंबर २, शिरसवाडी, औंढी, शिरशी जुना, शिरशी (भैरवदरा), शिवरवाडी, पावलेवाडी नं. १, भटवाडी हे १० तलाव कोरडेच आहेत, तर पाडळी (३० टक्के), पणुंबे्र तर्फ शिराळा नं. १ (१५), करमाळा नं. १ (३०), खेड (२०), पाडळीवाडी (२०), वाकुर्डे खुर्द (३५), अंत्री खुर्द (४०), निगडी महारदरा (२०), आटुगडेवाडी मेणी (३५), वाडीभागाई (३५), तडवळे (३०), हत्तेगाव (५०), गवळेवाडी उंदीरखोरा (४०), गवळेवाडी बहिरखोरा (५०), हातेगाव अंबाबाईवाडी (४५), धायवडे कुंडनाला (३५), मेणी साकु्रंपीनाला (४०), बादेवाडी (४५), शिरशी कासारकी (३०), कोंडाईवाडी नं. १ (२५), चव्हाणवाडी (३०), वाकुर्डे बुद्रुक जामदाड (३०), चरणवाडी नं. १ (२०), कापरी (४०), बिऊर (४५), खिरवडे (५०), शिरशी काळेखिंड (१०), भैरेवाडी (२०), पाचुंबी (३५), तडवळे नं. १ (२०), पावलेवाडी नं. २ (२०), भाटशिरगाव (३५), रेड क्र. २ (६०), पणुंब्रे तर्फ शिराळा नं. २ (२०), करमाळे नंबर २ (२०), निगडी खोकडदरा (१०), लादेवाडी (२०), इंग्रुळ (२०), सावंतवाडी (३० टक्के) एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.यामुळे पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. पाऊस न झाल्याने जनावरांच्याचाऱ्याचा प्रश्नही गंभीर होणार आहे. तालुक्यात चांगला पाऊस होतो. त्यामुळे जुलै महिन्यातच सर्व धरणे, पाझर तलाव भरतात. मात्र यावर्षी पाऊस नसल्याने ५० टक्के सुद्धा पाणी नाही. शिराळा तोरणा ओढ्यास एकदाही पूर आलेला नाही. अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे.यावर्षी सुरुवातीस पिके चांगली होती. ही पिके जोमात यायला आणि पाऊस गायब व्हायला. त्यामुळे आता सोयाबीन, भात, ऊस आदी पिके करपू लागली आहेत. तसेच वाढही खुंटली आहे. वाकुर्डे योजनेचे पाणी सोडल्यास उत्तर भाग तसेच मोरणा नदीकाठास पाणी मिळू शकेल.चांदोली धरण जुलै, आॅगस्ट महिन्यात भरते. त्यानंतर वीजनिर्मिती केंद्र व सांडव्यातून पाणी सोडले जाते. मात्र यावर्षी फक्त पाणी पूजनासाठी चार दरवाजांतून पाणी सोडण्यात आले व ते लगेच बंद करण्यात आले. गेल्या दहा वर्षात या दरवाजातून पाणी न सोडण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे सांडवा कोरडा आहे. सध्या धरणात ९४.५५ टक्के म्हणजे ३२ टीएमसी पाणीसाठा आहे.संपूर्ण आॅगस्ट महिना कोरडा गेला आहे. त्याचबरोबर कडक उन्हामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेली पिके करपू लागली आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. मंडलनिहाय ६ सप्टेंबरअखेरचा पाऊसमंडल वर्ष २०१२ २०१३२०१४२०१५शिराळा५९८८२६९८८३९४शिरशी४५०१०५८५०७३१५कोकरुड१३१५१४३११२७३७६८चरण१२६६१३९०१४९१६६६मांगले७०२८०९१०१६४५०सागाव६०१८५६८७९४२०चांदोली धरण२१७७२८७०२८४४१४५३