शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

पावसाची उघडझाप

By admin | Updated: June 26, 2016 00:54 IST

नद्यांच्या पातळीत वाढ : गगनबावड्यात सर्वाधिक पाऊस

कोल्हापूर : जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात २६ मिलिमीटर झाला. धरणक्षेत्रात अजून अपेक्षित दमदार पाऊस होत नसून नद्यांच्या पातळीत थोडी वाढ झाली आहे. जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी ३३७.७९ मिलिमीटर पाऊस होतो, यंदा आतापर्यंत केवळ ११०.९७ मिलिमीटर (३२.८५ टक्के) पाऊस झाला आहे. मान्सूनने आगमन केले असले तरी अजूनही त्याला ताकद लागलेली नाही. शनिवारी दिवसभर जिल्ह्यात उघडझापच राहिली. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत राहिल्या. धरणक्षेत्रातही पाऊस नसल्याने पाणीपातळीत वाढ होत नाही. राधानगरी धरणक्षेत्रात १६, वारणा परिसरात २, दूधगंगा धरण क्षेत्रात ५, तर कासारी परिसरात २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी, वारणा, दूधगंगा धरणांचा पाणीसाठा ‘जैसे थे’ असून कुंभी, घटप्रभा, चिकोत्राच्या पाणीसाठ्यात थोडी वाढ झाली आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ४.३१ मिलिमीटर पाऊस झाला असून, गगनबावडा व चंदगड तालुक्यांत चांगला पाऊस झाला. नद्यांच्या पातळीत किंचित वाढ झाली असून, पंचगंगा नदीपातळीत एक फुटाने वाढ झाली आहे. राजाराम बंधाऱ्यातून होणाऱ्या विसर्गात प्रतिसेकंद २५० घनफुटांनी वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)