शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

सकाळी पाऊस, दुपारनंतर उघडीप

By admin | Updated: June 26, 2015 01:05 IST

शहरातील चित्र : पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ; जिल्ह्यातील २६ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : सकाळी पाऊस आणि दुपारनंतर उघडीप असे वातावरण शहर आणि परिसरात राहिले. मात्र, तळकोकणात पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे जिल्ह्यातील कोल्हापूर पद्धतीचे २६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी आठपर्यंत झालेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ५३३ मिलिमीटर पाऊस झाला आहे.गेले दोन दिवस शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. उन्हाळ्यात वारंवार झालेला वळीव व दोन दिवसांपासून पडणारा जोरदार पाऊस यांमुळे नदी, ओढे भरून वाहत आहेत. सखल भागांत पाणी तुंंबले आहे. हवेत कमालीचा गारठा आहे. पावसाळी साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे. शेतकरी शेतात थांबलेले पाणी बाहेर काढण्यात व्यस्त आहेत. भाताच्या रोपलागणीला वेग आला आहे. गुरुवारी सकाळी ११ पर्यंत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. तीन दिवसांनंतर दुपारी उन्हाचे दर्शन झाले. ढगाळ वातावरण व वारा यांमुळे गारठा कायम राहिला.गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यांत पावसाच्या जोरदार सरी कोसळत राहिल्या. पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर गेल्याने काठावरील मंदिरांत पाणी गेले आहे. त्याचबरोबर भोगावती, कुंभी, कासारी, वारणा, वेदगंगा, हिरण्यकेशी नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, शिंगणापूर; तर भोेगावती नदीवरील हळदी, राशिवडे, खडक कोगे, सरकारी कोगे आणि कासारी नदीवरील कांटे, पेंडाखळे, करंजफेण, बाजारभोगाव, यवलूज, ठाणे, आळवे, पुनाळ, तिरपण; तर वेदगंगा नदीवरील बस्तवडे, चिखली, कुरणीतील तीन, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव, वारणा नदीवरील माणगाव, चिंचोली, कोडोलीतील दोन असे २६ बंधारे पाण्याखाली आहेत. या मार्गांवरील वाहतूूक पर्यायी मार्गांनी सुरू आहे. पावसाचा ‘महावितरण’ला फटका...गेल्या आठवड्यापासून पाऊस सुरू झाल्याने वीजवाहिन्यांवर झाडे व फांद्या पडणे, खांब उन्मळून पडणे यांमुळे महावितरणाला फटका बसला आहे. आठ दिवसांत पावसामुळे विभागातील ७११ खांब कोसळले. यातील ४६० खांब पुन्हा उभे करण्यात आले. १३४ खांब व १० रोहित्रे उभी करण्याचे काम सुरू आहे. खांब पडल्याने व विद्युत तारा तुटल्याने संबंधित भागातील वीजपुरवठा खंडित होत आहे. शक्य तितक्या लवकर वीजपुरवठा सुरू करण्याचा ‘महावितरण’ प्रयत्न करीत आहे.घटप्रभा ‘फुल्ल’घटप्रभा धरणातून प्रतिसेकंद ३७१३ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोदे लघू पाटबंधारे प्रकल्प ८० टक्के भरला आहे. राजाराम बंधाऱ्यातून ३३६०८, सांगली बंधाऱ्यातून २५१६४, अंकली बंधाऱ्यातून ४८५२०, राजापूर बंधाऱ्यातून ६२२१० घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे.तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) हातकणंगले - ६.३, शिरोळ - ३.३, पन्हाळा - ३८, शाहूवाडी - ५१, राधानगरी - ६१.२, गगनबावडा - १२५, करवीर - १५.६, कागल - २१.९, गडहिंग्लज - २५.३, भुदरगड - ३६, आजरा - ६५.८, चंदगड - ८४.७.