शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षबागांच्या मुळावर पाऊस

By admin | Updated: December 12, 2014 23:32 IST

दावण्याचा प्रादुर्भाव : जिल्ह्यात २४ तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

सांगली : लक्षद्वीप ते नैऋत्य मध्य प्रदेश व उत्तर गुजरातपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह सांगली जिल्ह्यातील शिराळा, खानापूर, आटपाडी, मिरज तालुक्यांत आज, शुक्रवारी पाऊस झाला. येत्या २४ तासांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांची झोप उडाली आहे. बागांवर दावण्याचा प्रादुर्भाव होत असून, तयार द्राक्षांमध्ये नत्राचे प्रमाण वाढून मणी तडकण्याची शक्यता आहे.वाळवा, मिरज, तासगाव, खानापूर आटपाडी तालुक्यांतील काही भागामध्ये आज, शुक्रवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. शिराळा तालुक्यातील पुनवत परिसरात आणि मिरज तालुक्यातील बुधगाव, माधवनगर परिसरात सकाळी, तर लिंगनूर, बेडग, सोनी परिसरात सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. विटा शहरासह खानापूर तालुक्यातील वेजेगाव, साळशिंगे, परिसरात सायंकाळी विजेच्या कडकडाटांसह पाऊस झाला. हा पाऊस रब्बीसाठी फायद्याचा असला, तरी द्राक्ष पिकासाठी हानिकारक आहे. कार्वे, बामणी, पारे परिसरातही तुरळक पाऊस झाला. खानापूर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पूर्वभागातील निर्यातक्षम बागायतदार हादरला आहे. तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात ढगाळ हवामान होते. सध्या मिरज, तासगाव तालुक्यातील दहा ते पंधरा टक्के द्राक्षबागांमधील काळी द्राक्षे तयार झाली असून, त्यांची बाजारपेठेत विक्री सुरू आहे. काही द्राक्षे येत्या पंधरा दिवसांत विक्रीसाठी येणार असल्याचे द्राक्ष बागायतदार नामदेव पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)द्राक्षांच्या मणी तडकलेपावसामुळे द्राक्षांच्या मण्यांमध्ये नत्र तयार होऊन मणी तडकले जात आहेत. यातून शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. उर्वरित ८५ टक्के द्राक्षबागांतील मणी महिन्याभरात तयार होण्याची शक्यता असून, अवकाळी पावसामुळे दावण्या रोगाचा फैलाव होण्याची शक्यता आहे.पुणे हवामान विभागाने येत्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तविली असून, ४८ तास ढगाळ हवामान राहणार असल्याचे सांगितले आहे. या हवामानामुळे द्राक्ष बागायतदारांनी औषध फवारणी सुरू केली आहे.