शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्णात पावसाचा शिडकावा दिवसभर ढगाळ वातावरण

By admin | Updated: March 1, 2015 00:43 IST

पावसामुळे वेलवर्गीय पिकांना फटका बसणार

 कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्णात शनिवारी दुपारी दीड वाजता पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सकाळपासून जिल्ह्णात ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरण व पावसामुळे वेलवर्गीय पिकांना फटका बसणार आहे. यंदा फेबु्रवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा तडाखा सुरू झाला होता. गेले पंधरा दिवस तर उन्हाचा कडाका कमालीचा वाढला होता. फेबु्रवारी महिन्यातच एप्रिल-मे मधील उष्मा जाणवत होता. सकाळी नऊ वाजल्यापासूनच अंगाची लाहीलाही सुरू होती. शनिवारी सकाळपासूनच जिल्ह्णात ढगाळ वातावरण होते. दुपारी दीड वाजता हलक्या सरी कोसळल्या. साधारणत: तासभर हलका शिडकावा सुरू राहिला. त्यानंतर ढगाळ वातावरण कायम राहिले. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. पावसानंतर हवेत गारवा निर्माण झाल्याने उष्म्याने हैराण झालेल्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. ढगाळ हवामान व पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. वेलवर्गीय पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. जिल्ह्णातील बहुतांशी गुऱ्हाळघरे बंद झाली असली तरी सुरू असणाऱ्या गुऱ्हाळघरमालकांची अचानक आलेल्या पावसाने त्रेधातिरपीट उडाली. वीट व्यावसायिकांचे पावसामुळे धाबे दणाणले. सूर्यफूल, गहू पिकांना किडीचा प्रादुर्भाव शक्य कोपार्डे : शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण व तुरळक पाऊस यामुळे पावसाळी वातावरण सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा सर्वांत मोठा फटका रब्बीतील सूर्यफूल, गहू या पिकांना बसणार आहे, तर आणखी जादा पाऊस पडल्यास साखर कारखान्यांच्या हंगामाला अडचणी निर्माण होणार आहेत. उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वाऱ्याचा संयोग होऊन हे वातावरण निर्माण झाल्याचे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. या पावसामुळे सूर्यफुलावर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो, तर गहू पिकावर काळपट पडण्याबरोबर तांबेरा रोगाचाही प्रादुर्भाव होतो. सध्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून, जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविली असल्याने हंगाम अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.