शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे हत्येप्रकरणी ढालगावात छापे

By admin | Updated: September 22, 2015 00:59 IST

दोन घरांची झडती : प्रवीण लिमकरच्या नातेवाइकांकडे चौकशी

कवठेमहांकाळ : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास करणाऱ्या यंत्रणेने सनातन संस्थेच्या साधकांभोवतीचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी सहा ते सातजणांच्या पथकाने मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित प्रवीण रमेश लिमकर (वय ३०) याच्या ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील दोन नातलगांच्या घरांवर छापे टाकले. दोन ते तीन तास घरांची झडती सुरू होती. या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.तपास यंत्रणेच्या हाती काय लागले, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. या कारवाईमागील नेमके कारण समजू शकले नसले, तरी सहा वर्षांपासून फरार असलेला प्रवीण लिमकर त्याच्या नातलगांच्या संपर्कात आहे का, याची चौकशी करण्यासाठीच छापे टाकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी लिमकरच्या सर्व नातलगांचे मोबाईल क्रमांक घेतले असल्याचे समजते.गोव्यातील मडगावात १६ आॅक्टोबर २००९ रोजी दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासूर प्रतिमा वधाच्या कार्यक्रमापासून शंभर मीटर अंतरावर बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटप्रकरणी सारंग अकोलकर, रुद्रगौडा पाटील, जयप्रकाश हेगडे आणि प्रवीण लिमकर या सनातन संस्थेच्या चार साधकांची नावे प्रमुख संशयित म्हणून पुढे आली होती. बॉम्ब तयार करण्यासोबतच शस्त्र चालविण्याचे कारवाईबाबत कमालीची गुप्तताप्रशिक्षण घेतलेले सनातन संस्थेचे हे चार साधक गेल्या सहा वर्षांपासून फरारी आहेत. त्यांच्याविरोधात ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजावली आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणीही तपास यंत्रणा त्यांच्या मागावर आहेत.त्यातील प्रवीण लिमकर मूळचा कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगावचा आहे. तो कोल्हापुरात ‘सनातन प्रभात’चा वार्ताहर होता. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सांगलीतून ‘सनातन’चा साधक समीर गायकवाड याला ताब्यात घेतल्यानंतर तपास यंत्रणांचा ‘सनातन’वरील संशय आणखी बळावला आहे. मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित रुद्रगौडा पाटील याचेच नाव पानसरे हत्येप्रकरणी प्रमुख संशयित म्हणून पुढे आल्यानंतर पोलिसांनी मडगाव प्रकरणातील इतर तीन संशयितांकडेही मोर्चा वळवला असल्याचे समजते.सहा वर्षांपासून फरारी असलेल्या प्रवीण लिमकर याच्या नातलगांच्या ढालगाव येथील घरी तपास यंत्रणेच्या सहा ते सातजणांच्या पथकाने छापे टाकले असल्याचे समजते. दुपारी बाराच्यादरम्यान हे पथक ढालगाव येथे दाखल झाले. या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. कवठेमहांकाळ पोलिसांनाही याची माहिती नव्हती. सुरुवातीला प्रदीप दिगंबर लिमकर आणि नंतर दीपक दिगंबर लिमकर या प्रवीणच्या दोन चुलत्यांच्या घरांची पथकाने झडती घेतली. या कारवाईदरम्यान घरातील सर्व सदस्यांना घरातून बाहेर काढण्यात आले होते. आतमध्ये पथकाने नेमका कशाचा तपास केला आणि त्यांना काय सापडले, याचीही गुप्तता पाळण्यात आली आहे. दोन ते तीन तासांच्या कारवाईनंतर परत जाताना मात्र पथकाने सर्व नातलगांचे मोबाईल क्रमांक घेतले असल्याचे समजते. या कारवाईमागील नेमका हेतू समजू शकला नाही. परंतु मोबाईल क्रमांक घेतल्याने त्याच्याआधारे नातेवाईक आणि प्रवीण लिमकर यांचा संपर्क आहे का, याची चौकशी पथक करणार असल्याचे समजते.