शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सांगली पोलिसांच्या घरांवर छापे

By admin | Updated: April 25, 2017 00:00 IST

सांगली पोलिसांच्या घरांवर छापे

कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील चोरीप्रकरणी संशयित सांगली पोलिसांच्या घरांवर सोमवारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) तीन पथकांनी छापे टाकले. संशयित कुटुंबासह बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती ‘सीआयडी’च्या सूत्रांनी दिली. शिक्षक कॉलनी चोरी प्रकरणात संगनमताने ९ कोटी १८ लाख रुपये परस्पर हडप करून खोटा तपास दाखविल्याप्रकरणी सांगलीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, ) पोलिस हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, पोलिस नाईक रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे यांच्यासह मैनुद्दीन मुल्ला, प्रवीण भास्कर-सावंत यांच्या विरोेधात कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) करत आहे. या विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे हे तपास अधिकारी आहेत तर अप्पर पोलिस महासंचालक संजयकुमार व पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम मार्गदर्शन करत आहेत. संशयित पोलिसांच्या अटकेसाठी तीन विशेष पथके नियुक्त केले आहेत. त्यांनी सोमवारी पुणे, सांगली, मिरज, कौलापूर येथील घरांवर छापे टाकले असता सर्वजण कुटुंबासह घराला कुलूप लावून पसार झाल्याचे दिसून आले. संशयितांनी मोबाईल बंद ठेवल्याने त्यांचे लोकेशन मिळून आले नाही. मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये राहणाऱ्या मैनुद्दीन मुल्ला याच्या घराची झडती घेत पत्नीचा जबाब घेतला. रात्री उशिरा पोलिस अधीक्षक बनसोडे यांनी शिक्षक कॉलनीतील ‘त्या’ खोलीची पाहणी करून पंचनामा केला. या गुन्ह्यात फिर्यादी झुंझारराव सरनोबतयांच्यासह आणखी काहीजणांकडे ‘सीआयडी’चे पथक चौकशी करणार आहे. (प्रतिनिधी)प्राप्तिकर खात्याने केली चौकशीझुंझारराव सरनोबत यांनी १४ कोटी रुपयांची चोरी झाल्याची फिर्याद देताच प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी सरनोबत यांची कसून चौकशी केली. पैसा कोणाचा व तो आणला कुठून या प्रश्नांचा भडिमार केला. कोल्हापूर पोलिसांकडूनही तपासासंबंधी माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. बँक खात्यांची चौकशी पोलिसांनी त्याच्यासह विनायक जाधव (रा. भामटे, ता. करवीर), संदीप बाबासाहेब तोरस्कर (रा. बापट कॅम्प, कोल्हापूर) यांच्या बँक खात्यांची चौकशी केली व रेहान अन्सारी (रा. बिहार) याचा गुन्ह्यात सहभाग आहे की नाही, या संभ्रमावस्थेत पोलिस आहेत.गुंडा ढोलेला कोठडी कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या संशयित महादेव ऊर्फ गुंडा नामदेव ढोले (वय ४४, रा. कोडोली, ता. पन्हाळा) याला पन्हाळा न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.सरनोबत फिरकले नाहीत शिक्षक कॉलनीतील चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी फिर्यादी झुंझारराव सरनोबत यांना रविवार व सोमवारी चौकशीसाठी पोलिस मुख्यालयात येण्यास निरोप दिला होता; परंतु ते दोन दिवस फिरकलेच नाहीत.