शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मिरज, कर्नाटकातील पारधी तांड्यांवर छापे

By admin | Updated: March 24, 2015 00:14 IST

पानसरे हत्या प्रकरण : गुन्हेगारांची धरपकड; चौघे ताब्यात

सांगली : ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी मिरजेतील एका दाम्पत्याने दिलेल्या माहितीच्या आधारे कोल्हापूर पोलिसांनी रविवारी रात्रीपासून मिरज व कर्नाटकातील पारधी तांड्यांवर छापे टाकून संशयित गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे. या कारवाईत सांगली पोलिसांना न घेता कोल्हापूर पोलिसांची स्वतंत्रपणे कारवाई सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत चार गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र तपासात मदत होईल, अशी कोणतीही माहिती हाती लागलेली नाही. यामुळे धरपकड व चौकशी सत्र सुरूच आहे.फासेपारधी गुन्हेगाराने २५ लाखांची ‘सुपारी’ घेऊन पानसरे यांची हत्या केल्याची माहिती एका दाम्पत्याने दिली असली तरी, पोलिसांचा त्यावर पूर्ण विश्वास नाही. या तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असल्याने, जी माहिती मिळेल, तो धागा पकडून पोलीस पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी या दाम्पत्याची विशेष काळजी घेऊन, ज्या फासेपारधी गुन्हेगाराने ‘सुपारी’ घेऊन पानसरे यांची हत्या केली, त्याबद्दल बारकाईने माहिती घेणे सुरू ठेवले आहे. या दाम्पत्याने या गुन्हेगाराचे नावही पोलिसांना दिले आहे. त्याचे मिरज व कर्नाटकात वास्तव्य असल्याने रविवारी रात्री कोल्हापूर पोलिसांची चार पथके मिरजेत दाखल झाली होती. त्यांच्यासोबत हे दाम्पत्यही होते. पथकाने मिरज तसेच तालुक्यातील पारधी तांड्यांवर छापे टाकले. कर्नाटकातही काही पथके रवाना झाली होती. तेथील पोलिसांच्या मदतीने छापे टाकून गुन्हेगारांचा शोध घेतला. चार संशयित हाती लागले; पण दाम्पत्याने नाव सांगितलेला गुन्हेगार मिळालेला नाही.रेकॉर्डवरील सातशेहून अधिक दुचाकी चोरट्यांची चौकशी झाली आहे. वाळवा तालुक्यातील चार तरुणांची नावे पुढे आली होती, त्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. जोपर्यंत ठोस माहिती हाती लागत नाही, तोपर्यंत चौकशी व छापासत्र सुरूच राहील. (प्रतिनिधी)नेतेही चौकशीच्या जाळ्यात!सांगली जिल्ह्यात फासेपारधी समाज व गुन्हेगारांना एकत्रित करुन त्यांना शासनाच्या सोयी-सुविधा मिळवून देणारे काही नेते कोल्हापूर पोलिसांच्या चौकशीच्या जाळ्यात अडकले आहेत. या नेत्यांना प्रत्येक पारधी कुटुंबातील गुन्हेगार परिचयाचा आहे. यामुळे या नेत्यांकडून काही माहिती मिळते का, यासाठीही प्रयत्न सुरु आहेत.