शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

उजळाईवाडीत गावठी दारूअड्ड्यांवर छापे

By admin | Updated: December 27, 2015 01:31 IST

सातजणांना अटक : ग्रा. पं. सदस्याचा समावेश

कोल्हापूर : गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उजळाईवाडी येथील गावठी हातभट्टी दारूअड्ड्यांवर शनिवारी सकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून ग्रामपंचायत सदस्यांसह सातजणांना अटक केली. संशयित आरोपी ग्रामपंचायत सदस्य मोहन रामसिंग मछले (वय ४२), नितीन शशिकांत गागडे (२८), शागिर्द श्रीशांत तमायचे (३०), विष्णू सुरेश गुमाने (३०), कार्तिक अशोक गागडे (३५), गोपाळ बाळू अभंगे (५५), कृ ष्णा विष्णू गुमाने (३५) अशी त्यांची नावे आहेत. यावेळी हातभट्ट्या उद्ध्वस्त करून सुमारे पंचाहत्तर हजार किमतीचा मद्यसाठा जप्त केला. ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध दारूअड्ड्यांवर छापे टाकण्याचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक चैतन्या एस. यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उजळाईवाडी येथील गावठी हातभट्ट्यांवर छापे टाकून सातजणांना अटक केली. येथील जमिनीच्या खाली पुरून ठेवलेले बॅरेल, हातभट्ट्या जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त करून ७०० लिटर दारू, तीन हजार लिटर रसायन, ६० किलो गूळ, असा एकूण पंच्चाहत्तर हजार किमतीचा मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे, विकास जाधव, रमेश खुणे, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र पालवे, सुशील वंजारी, सचिन पंडित, आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)