शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीची छेडछाड; मामा-भाच्यास बेदम चोप

By admin | Updated: February 14, 2016 01:04 IST

बसंत-बहार रोडवरील घटना : परिसरात तणाव

कोल्हापूर : शाहूपुरी बसंत-बहार रोडवर तरुणीची छेड काढल्याच्या रागातून नातेवाइकांनी खाद्यपदार्थ गाडी चालविणाऱ्या मामा-भाच्यास बेदम चोप दिला. यावेळी संतप्त नागरिकांनी खाद्यपदार्थ विस्कटून टाकले. ही घटना शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. यावेळी नागरिकांच्या हाताला हिसडा मारून छेड काढणाऱ्या भाच्याने तेथून पळ काढला. याप्रकरणी पीडित तरुणीच्या आईने शाहूपुरी पोलीस ठाण्यात विकी मुल्ल्या (वय १९) याच्या विरोधात फिर्याद दिली. याबाबत पोलिसांनी सांगितले, शाहूपुरीतील हॉटेल सायबासमोर नारायण मुल्ल्या यांची ‘महालक्ष्मी’ खाद्यपदार्थांची गाडी आहे. त्यांनी ती नातेवाईक पुरंदर पुलाड (रा. नागाळा पार्क) यांना चालविण्यास दिली आहे. पुलाड यांचा भाचा विकेश मुल्ल्या हा दुपारनंतर खाद्यपदार्थांच्या गाडीवर असतो. शनिवारी याच परिसरात राहणारी तरुणी महावीर कॉलेजमधून घरी येत होती. यावेळी विकेश याने तिला वाटेत अडवून तिचा हात पकडून जबरदस्तीने दुचाकीवर बसवू लागला. यावेळी तिने त्याच्या हातून सुटका करीत घरी जाऊन आईला सांगितले. त्यानंतर तिची आई काही नातेवाइकांना घेऊन खाद्यपदार्थांच्या गाडीवर आली. याठिकाणी उभ्या असलेल्या विकेश याला शिव्यांची लाखोली वाहत बेदम चोप दिला. यावेळी त्याने हिसडा मारून तेथून पळ काढला. त्यानंतर संतप्त नातेवाइकांनी त्याचा मामा पुलाड यांनाही बेदम चोप देत गाडीवरील खाद्यपदार्थ विस्कटून टाकले. त्यानंतर पीडित तरुणीच्या आईने विकेश मुल्ल्या याच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)