शिरोळ : शिरोळ ते कोल्हापूर बायपास मार्गावर मौजे आगर गावच्या हद्दीत असलेल्या बेकायदा कॅसिनो जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून सहा जणांवर कारवाई केली. या कारवाईत ४ लाख १७ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रणजित रघुनाथ पडियार, प्रेम विजय पडियार, गणेश शंकर विठेकर (तिघे रा. जयसिंगपूर), नीलेश श्रीकांत कमलाकर (रा. संभाजीपूर), आनंद भीमराव शिवणगे (रा. धरणगुत्ती) व शंकर चव्हाण (रा. आगर) अशी संशयित आरोपींची नावे असून, गुन्हेशोध पथकाने गुरुवारी रात्री ही कारवाई केली. या ठिकाणी आॅनलाइन जुगार खेळला जात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. या वेळी रोख रक्कम, सहा कॉम्प्युटर संच, पाच मोबाईल, तीन मोटरसायकली असा जुगाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याबाबतची तक्रार पोलीस नाईक बालाजी पाटील यांनी दिली.
फोटो - १७०९२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - कोल्हापूर गुन्हे शोध पोलीस पथकाने कॅसिनो जुगार अड्ड्यावर छापा टाकून संशयितावर कारवाई केली.