शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

राहुल आवाडेंचे बंड रात्रीत थंड : राजू शेट्टी यांच्या विजयासाठी झटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 01:04 IST

आमच्या मनातील शंका दूर झाल्याने हातकणंगले मतदारसंघातून मी अर्ज भरणार नाही. महाआघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती

ठळक मुद्देउमेदवारी अर्ज भरणार नाही

कोल्हापूर : आमच्या मनातील शंका दूर झाल्याने हातकणंगले मतदारसंघातून मी अर्ज भरणार नाही. महाआघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांचा मुलगा राहुल आवाडे यांनी सोमवारी (दि. १) हातकणंगले मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केल्याने आघाडीत खळबळ उडाली होती. गुरुवारी (दि. २८) दिवसभर आघाडीत यावर उलटसुलट चर्चा झाली. रात्री बारा वाजता खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे व प्रकाश आवाडे यांची बैठक होऊन निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. अवघ्या एका रात्रीत राहुल आवाडेंचे बंड थंड झाले असले तरी दोन्ही कॉँग्रेसच्या पातळीवर त्याचे तीव्र पडसाद उमटले. त्यासाठी प्रकाश आवाडे यांना शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन बंड शमल्याचे सांगावे लागले.

राहुल म्हणाले, ‘हातकणंगले मतदारसंघात कॉँग्रेस व आवाडे गटाची मोठी ताकद आहे; पण अनवधानाने असेल; काही चुका झाल्याने आवाडे गटाचे तरुण कार्यकर्ते दुखावले होते. त्यातून आपण ‘हातकणंगले’तून उमेदवारी करावी, असा कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याने उमेदवारीची घोषणा केली; पण या चुकांमध्ये सुधारणा झाल्याने उमेदवारीचा निर्णय मागे घेतला आहे. आघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांच्यामागे ठाम राहणार आहे.येडेमच्छिंद्रला निमंत्रण नव्हतेखासदार राजू शेट्टी यांच्या प्रचाराचा प्रारंभ येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथून करण्यात आला. कॉँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून आपणासह कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांनी निमंत्रित करणे गरजेचे होते; पण त्यांनी आम्हाला बोलवले नाही ही वस्तूस्थिती आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहण्यासाठी शेट्टी यांनी मला फोन केला होता, त्यावेळी आपण मुंबईत होतो, असा खुलासाही प्रकाश आवाडे यांनी केला.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल आवाडे यांनी हातकणंगले मतदारसंघातून बंडखोरी करण्याची घोषणा गुरुवारी केल्याने खळबळ उडाली होती; पण रात्रीत यू टर्न घेत त्यांनी आपण निवडणूक लढणार नसल्याची घोषणा राहुल आवाडे व प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी कॉँग्रेस कमिटीत केली.

टॅग्स :Politicsराजकारणkolar-pcकोलार