शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आर. सी. पाटील यांच्यामुळे एस. टी. फायद्यात

By admin | Updated: December 31, 2014 00:11 IST

पी. एन. पाटील यांचे गौरवोद्गार : सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

कोल्हापूर : परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक आर. सी. पाटील यांनी कर्मचारी, प्रवासी यांच्याशी चांगले संबंध ठेवत अनेक नवीन उपक्रम राबविले. त्यांच्या काळातच खऱ्या अर्थाने परिवहन महामंडळ फायद्यात आल्याचे गौरवोद्गार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी काढले. आर. सी. पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शाहू स्मारक भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पाटील म्हणाले, आर. सी. पाटील यांनी एस. टी. महामंडळाच्या फायद्याच्या अनेक योजना राबविल्या. त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊनच परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती होईल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाही पी. एन. पाटील यांनी दिली. के. पी. पाटील म्हणाले, आर. सी. पाटील यांनी कर्मचाऱ्यांबरोबर प्रवाशांना न्याय देण्याचे काम केले. अलीकडील काळात एस. टी. समोर नवीन आव्हाने उभी आहेत, त्यातून मार्ग काढण्यासाठी आर. सी. पाटील यांच्यासारखी अनुभवी माणसे महामंडळावर असणे गरजेचे आहे. मालोजीराजे छत्रपती म्हणाले, अधिकारी कसा असावा, हे आर. सी. पाटील यांच्या कर्तृत्वाकडे पाहिले की समजते. कर्मचारी, लोकप्रतिनिधी, प्रवासी यांची सांगड बांधून महामंडळाला ऊर्जितावस्था देण्याचे काम त्यांनी केले. माझ्या सत्कारासाठी मंत्रिमहोदयही आले असते, पण त्यापेक्षा सहा कर्मचारी संघटना एकत्रित येऊन व ज्यांनी माझ्या आयुष्यात मदत केली त्यांच्या हस्ते झालेला सत्कार फार मोठा असल्याचे सांगत एस. टी. महामंडळाचे महाव्यवस्थापक आर. सी. पाटील म्हणाले, आजपर्यंत कर्मचाऱ्यांना समजावून घेऊन काम केले. एखाद्याला शिक्षा करत असताना त्याची समजूत काढून, त्याला चहा पाजून बडतर्फ केल्याने माझे ऋणानुबंध कायम राहिले. आर. सी. पाटील व त्यांच्या पत्नी सुचित्रा पाटील यांचा सत्कार पी. एन. पाटील यांच्या हस्ते झाला. एस. टी. महामंडळाचे संचालक ए. वाय. पाटील, डी. बी. वारंग, श्री. ताटे आदींनी मनोगत व्यक्त केले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील यांनी स्वागत केले. विभाग नियंत्रक सुहास जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.