शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
3
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
4
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
6
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
7
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
8
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
9
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
10
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
11
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
12
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
13
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
14
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
15
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
16
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
17
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
18
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
19
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
20
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 

‘गोकुळ’साठी रांगा लावून ९९. ७८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) रविवारी अत्यंत ईर्षेने रांगा लावून ९९.७८ टक्के ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) रविवारी अत्यंत ईर्षेने रांगा लावून ९९.७८ टक्के मतदान झाले. करवीर, शिरोळ, गडहिंग्लज, पन्हाळा, चंदगड, कागल व हातकणंगले तालुक्यात १०० टक्के मतदान झाले. सत्तारूढ व विरोधी आघाडीने ठरावधारकांना एकत्रित आणत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सत्तारूढ गटाचे नेते आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक व विरोधी आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

संघाला दूध पुरवठा करणारे साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकरी असले तरी, मतदार मात्र ३५४७ आहेत. कारण दूध संस्थेच्या एका प्रतिनिधीलाच मतदानाचा अधिकार आहे. उद्या मंगळवारी (दि. ४) दुपारपर्यंत या संघाची सत्ता कोणाकडे जाणार, याचा फैसला होईल.

सुमारे चोवीसशे कोटी रुपयांची उलाढाल, देशभरात नावाजलेला ब्रॅंड आणि जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या संसाराची घडी बसविणारा संघ, अशी गोकुळ दूध संघाची ओळख आहे. गेली पंचवीस वर्षे काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महाडिक यांचे या संघावर राजकीय वर्चस्व आहे. त्यांना प्रथमच काँग्रेसचेच पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आव्हान दिले आहे. काँग्रेस-भाजप-शिवसेना विरुध्द महाविकास आघाडीसह भाजप असे लढतीचे चित्र आहे.

कर्जमाफी, कोरोनामुळे तब्बल सव्वा वर्ष ‘गोकुळ’ची निवडणूक लांबणीवर पडली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रक्रिया सुरू झाली, मात्र सत्तारूढ गटाच्यावतीने निवडणूक स्थगितीसाठी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. येथेही सुरक्षितता पाळून निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यानंतर रविवारी प्रक्रिया पार पडली. जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या ‘गोकुळ’च्या सत्तेसाठी साम, दाम, दंड सर्व नीतीचा वापर झाला. आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. संघाच्या कारभाराचा लेखाजोखा दोन्ही गटांकडून मांडण्यात आला. दोन्ही आघाड्यांकडून मतांसाठी अर्थकारण घडले. गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुमारे दोन हजार ठरावधारकांना अज्ञातस्थळी हलविले होते. कोरोनाबाधित मतदारांना पीपीई कीट घालूनच मतदानासाठी आणले होते. त्याशिवाय आजारी मतदारांना थेट केंद्रावर उचलून आणून मतदान करवून घेतले.

तालुकानिहाय झालेले मतदान असे

तालुका एकूण मतदान झालेले मतदान

गगनबावडा ७६ ७५

हातकणंगले ९५ ९५

शिरोळ १३३ १३३

राधानगरी ४५८ ४५७

गडहिंग्लज २७२ २७२

शाहूवाडी २८६ २८५

पन्हाळा ३५३ ३५३

आजरा २३३ २३२

करवीर ६३९ ६३९

भुदरगड ३७३ ३६९

चंदगड ३४६ ३४६

कागल ३८३ ३८३

एकूण ३६४७ ३६३९

कोट-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली. कोठेही गर्दी अथवा इतर प्रकार घडला नाही.

- वैभव नावडकर (निवडणूक निर्णय अधिकारी, गोकुळ)

नावडकर यांचे नेटके नियोजन

कोरोनाचा वाढता संसर्ग, राजकीय इर्षा यामुळे निवडणुकीकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, सहायक शरद पाटील व डॉ. गजेंद्र देशमुख यांनी नेटके नियोजन केल्याने कोठेही वादावादी अथवा अनुचित प्रकार घडला नाही.

४९० कर्मचाऱ्यांकडून प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यातील ७० मतदान केंद्रावर ३५० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्याशिवाय १४० पोलीस कर्मचारी होते. एकूण ४९० कर्मचाऱ्यांनी प्रक्रिया पुर्ण केली.

सोशल डिस्टन्सिंगची एैशी की तैशी

कोल्हापूरात रोज एक हजारापेक्षा अधिक कोरोना बाधित रूग्ण सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘गोकुळ’ची निवडणूक झाली, मतदान केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले असले तरी ठरावधारकांच्या शक्तिप्रदर्शनात सोशल डिस्टन्सिंगची एैशी की तैशी झाली होती.

बारा कोरोनाबाधित मतदार पीपीईकीटमध्ये

‘गोकुळ’चे बारा मतदार हे कोरोना बाधित असल्याने ते रुग्णालयात होते. त्यांना पीपीईकीट घालूनच मतदानासाठी आणले होते. त्याशिवाय आजारी मतदारांना थेट केंद्रावर उचलून आणून मतदान करून घेतले.

आणाभाका, दबावामुळे मतदार तणावाखाली

‘गोकुळ’च्या मागील निवडणुकीत मोठ्या प्रमाणात फुटीर मतदान झाल्याने सत्तारूढ गटाला फटका बसला होता. त्यामुळे यावेळेला दोन्ही आघाड्यांकडून पॅनेल टू पॅनेलसाठी मतदानासाठी कंबर कसली होती. जागृत देवस्थानच्या शपथा, भंडारा उचलणे याबरोबरच राजकीय दबावही टाकण्यात आले. त्यामुळे मतदार काहीसे तणावाखाली दिसत होते.