कुडित्रे येथे असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखेत ज्येष्ठ नागरिक, परित्यक्ता, अपंग, दिव्यांग, संजय गांधी निराधार पेन्शनरांची खाती मोठ्या प्रमाणात आहेत. वाकरे, कुडित्रे, कोपार्डे, आडूर, कळंबे, भामटे, चिंचवडे या सात गावातील 700 ते 800 पेन्शनरांची खाती या बँकेत आहेत. त्यामुळे दर महिन्याला पेन्शन घेण्यासाठी येथे माेठ्या प्रमाणात रांग पाहायला मिळते. सध्या बँकेचे कर्मचारी शटर खाली ओढूनच काम करत आहेत. छोट्याशा खिडकीतून चेक, स्लिप आत द्यावी लागते. यानंतर शिपाई कधी हाक मारतो याची वाट पाहत बसावी लागत असल्याने ज्येष्ठ नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
चौकट
: शटर उघडून कामकाज हवे
बँकेचे शटर झाकलेल्या अवस्थेत ठेवून कामकाज केले जात आहे. खिडकीच्या तोंडाला मोठी गर्दी होते. अशा गर्दीमुळे कोरोनाचा समूह संसर्गाचा धोका होण्याची भीती आहे. त्यामुळे शटर उघडून येथील व्यवहार सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.
कोट : दररोज कुडित्रे येथील शाखेत मोठी गर्दी होत असते. यावर बँक प्रशासनाने ग्राहकांना एटीएम सेवा, घरपोच पेन्शन द्यायची व्यवस्था करणे गरजेचे आहे. राजाराम कदम. उपसरपंच कुडित्रे
फोटो
: कुडित्रे, ता. करवीर येथील जिल्हा बँकेच्या समोर पेन्शनर व ग्राहकांची झालेली गर्दी.