शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हैसाळ’च्या प्रश्नावरून सर्वच पक्षाचे नेते मैदानात

By admin | Updated: October 12, 2015 00:36 IST

श्रेयासाठी धडपड : एकत्रित ताकद लावण्याची गरज

सांगली : म्हैसाळ योजनेच्या थकबाकीचा आणि शेतकऱ्यांवर त्याचा बोजा चढविण्याचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. यावरून सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरले असले तरी श्रेयासाठी झटण्यापेक्षा सर्वपक्षीय ताकद लागण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाने म्हैसाळ योजनेची २0 कोटीची थकबाकी शेतकऱ्यांच्या सात-बारावर चढविण्याची प्रक्रीया गेल्या आठवड्यात सुरू केली असून त्यास मिरज, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. याप्रश्नी आता विविध राजकीय पक्ष व त्यांचे नेतेही आंदोलनाचा इशारा देत आहेत. काहींनी न्यायालयात जाण्याची तयारीही केली आहे. प्रत्येकजण स्वतंत्रपणे लढण्यासाठी प्रयत्नशील असल्याने आंदोलनाची धार कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्रीतपणे लढा दिल्यास हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागू शकतो. टोलसारखी सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करून शासनस्तरावर याला विरोध झाला तर शेतकरी थकबाकीच्या बोजातून मुक्त होऊ शकतो. तशी अपेक्षा या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांमधूनही व्यक्त होत आहे. प्रशासकीय पातळीवरही त्यामुळे म्हणावा तसा दबाव पडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरीही वेगवेगळ््या पक्षीय संघर्षामुळे संभ्रमावस्थेत आहे. (प्रतिनिधी)