शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

इचलकरंजी पालिकेच्या स्वायत्ततेवरच प्रश्नचिन्ह

By admin | Updated: May 23, 2015 00:42 IST

पालिकेत अस्वस्थता : शहर अंतर्गत रस्ते होणार बांधकाम विभागामार्फत

इचलकरंजी : शहराच्या बाह्यवळण रस्त्यांचा विकास आणि अंतर्गत प्रमुख रस्ते करण्यासाठी शासनाकडून नगरपालिकेला मिळालेले बारा कोटी रुपयांचे विशेष अनुदान थेट सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्लूडी)मार्फत खर्च करण्यात येतील, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिल्याने नगरपालिकेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. शासनाकडून विविध विकास व नागरी सेवासुविधांसाठी मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम थेट शासनच विनियोग करणार असेल, तर नगरपालिकेच्या स्वायत्ततेचा प्रश्नच ऐरणीवर आला आहे.जकात बंद होऊन नगरपालिकांना मिळणाऱ्या सहाय्यक अनुदानावर अवलंबून रहावे लागते आहे. सहावा वेतन आयोग लागू झालेने शासनाकडून मिळणारे हे अनुदान अत्यंत तोकडे पडू लागले आहे. परिणामी, सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना व विशेष अनुदानातून नगरपालिकांना अनुदान रक्कम मिळवावी लागते आणि त्यातून अनेक विकासकामे व नागरी सेवासुविधा पुरवाव्या लागत आहेत. इचलकरंजी शहर वस्त्रोद्योगात अग्रेसर असल्याने येथे रस्ते, पाणी व अन्न पायाभूत सेवासुविधा पुरविण्यासाठी नगरपालिकेची दमछाक होते. म्हणून शहरास रस्त्याच्या विकास, मजबूतीकरण, डांबरीकरण व दुरूस्तीसाठी विशेष अनुदान मिळण्याचा प्रस्ताव नगरपालिकेने दिला होता.सध्याच्या नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे या राष्ट्रीय कॉँग्रेसच्या असून, त्यांची पक्षांतर्गत ठरलेली नगराध्यक्षपदाची मुदत संपल्यावर त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आणि बंड केले. या बंडाला नगरपालिकेत असलेल्या शहर विकास आघाडीने पाठिंबा दिला, तर शहर विकास आघाडीचे संस्थापक असलेले आमदार सुरेश हाळवणकर यांनी बिरंजे यांना पालिकेत येऊन अभय दिले. अशा पार्श्वभूमीवर नगरपालिकेत एका अर्थाने शहर विकास आघाडी सत्तास्थानी आहे, तर शहर विकास आघाडीचे प्रमुख नगरसेवक आणि कारभारी पालिकेचा कारभार हाकत आहेत, तरी विशेष रस्ता अनुदानाचे बारा कोटी थेट पीडब्लूडीमार्फत खर्च करणार असल्याचे आमदार हाळवणकर यांनी कालच (गुरुवारी) मुख्याधिकारी सुनील पवार यांची झाडाझडती घेताना सांगितले.त्यामुळे नगरपालिकेची विश्वासार्हता कमी झालेय, असे आ. हाळवणकर यांनी सूचित केलेय का, असा प्रश्न उद्भवल्याने नगरपालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे. येथून पुढे शासनाकडून विविध कामांना मिळणारे अनुदानसुद्धा संबंधित शासनाच्या खात्याकडूनच थेट वापरले जाणार, अशा शंकेने नगरपालिकेत अस्वस्थता पसरली आहे. (प्रतिनिधी)